Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » न्यायालयाचे दोन लिपिक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
गुन्हेगारी

न्यायालयाचे दोन लिपिक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

दोघांविरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत न्यायालयाच्या दोन लिपिकांना 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. भाडेकरूकडून सदनिकेचा ताबा मिळवून देण्यासाठी या लिपिकांनी सदनिका मालकाकडून लाचेची मागणी केली होती.

या प्रकरणी न्यायालयाचे लिपिक रवींद्र हिंदुराव पवार (40) आणि अमित बबन भुसारी (34) यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात कार्यरत आहेत.

सिंहगड रोड येथील हिंगणे खुर्द येथील विशाल पार्क सोसायटीत तक्रारदारांची सदनिका आहे, ती त्यांनी भाड्याने दिली होती. भाडेकरू सदनिका सोडण्यास तयार नसल्याने तक्रारदारांनी भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाने तक्रारदारांच्या बाजूने निकाल देत भाडेकरूला तात्काळ ताबा सोडण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी करून सदनिकेचा ताबा तक्रारदाराला मिळवून देण्यासाठी लिपिक रवींद्र पवार आणि अमित भुसारी यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी या कामासाठी तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

या लाच मागणीनंतर तक्रारदाराने 21 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. एसीबीच्या मध्यस्थीनंतर 35 हजार रुपये लाच देण्याचे ठरले. शुक्रवारी, (27 जून) पवार आणि भुसारी यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदाराला सदनिकेचा ताबा मिळवून दिला.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पवार आणि भुसारी यांनी तक्रारदाराला सिंहगड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बोलावले. एसीबीने हॉटेल परिसरात सापळा रचला होता. तक्रारदाराकडून 35 हजार रुपयांची लाच घेताना पवार आणि भुसारी यांना एसीबीने रंगेहाथ पकडले. या दोघांविरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 828
लाचखोरी लाचलुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar प्रतिनिधी | संगमनेर प्रशासनाच्या उघड्या डोळ्यांसमोर चाललेला कारभार आणि निष्काळजीपणामुळे संगमनेर शहरातील रस्ते…

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.