Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या! पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या! पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

चोरट्यांनी संपूर्ण तालुकाच आपले कार्यक्षेत्र बनवले आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर शहर आणि तालुक्यात अवैध धंदे आणि कत्तलखान्यांनंतर आता चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नुकत्याच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, निमोण आणि घारगाव येथे झालेल्या घरफोड्यांमध्ये लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व घटना एकाच दिवशी घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संगमनेरला पोलिस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी आणि संगमनेर शहर, संगमनेर तालुका आश्वी व घारगाव ही चार पोलिस ठाणी असूनही चोरट्यांवर पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याचे चित्र आहे. सोमवारी शहर हद्दीत रायते फाटा येथे झालेल्या घरफोडीत १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. मंगळवारी, संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीत तब्बल ४ लाख ८६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली.

त्याच दिवशी, निमोण गावात चोरट्यांनी घर फोडून ५४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. संगमनेर शहरात झालेल्या घरफोडीत १ लाख ६६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरीला गेली, तर तालुक्यातील पिंपळे गावातून ३० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी पळवले.

घरफोड्यांसोबतच संगमनेर तालुक्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील बसस्थानकावर गंठण चोरी, पर्स आणि पाकीट चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. एकाच दिवसात शहर, ग्रामीण आणि घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी घरफोड्या झाल्याने, चोरट्यांनी संपूर्ण तालुकाच आपले कार्यक्षेत्र बनवले आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,965
गुन्हेगारी घरफोड्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar प्रतिनिधी | संगमनेर प्रशासनाच्या उघड्या डोळ्यांसमोर चाललेला कारभार आणि निष्काळजीपणामुळे संगमनेर शहरातील रस्ते…

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.