Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
अपघात

चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालकांनीही रुग्णालयात धाव घेऊन आपल्या पाल्यांना आधार दिला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, ४ जुलै- प्रतिनिधी: 
पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आज (शुक्रवारी) सकाळी चंदनेश्वर विद्यालयाच्या स्कूल बसला भीषण अपघात होऊन चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने, या अपघातात कोणतीही गंभीर जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदनेश्वर विद्यालयाची एम.एच. १४ बी.ए. ८९३२ क्रमांकाची बस साकुर आणि आसपासच्या भागातून सुमारे ३५ हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन चंदनापुरी घाटातून शाळेकडे येत होती. पुणे-नाशिक महामार्गावर सध्या सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. याच दरम्यान, समोरून येणाऱ्या एका वाहनाने हुल दिल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या साईट गटारात पलटी झाली.
अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस हवालदार अमित महाजन आणि डोळासने महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत जखमी विद्यार्थ्यांना चंदनापुरी घाटावरील गुंजाळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालकांनीही रुग्णालयात धाव घेऊन आपल्या पाल्यांना आधार दिला.

या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना शहरांमधील शाळांमध्ये आणण्यासाठी अनेक शाळा प्रयत्नशील असतात, मात्र या स्कूल बसेस शासनाने घालून दिलेल्या नियमांचे आणि अटींचे पालन करतात का, याबाबत अनेकदा शंका उपस्थित होते.

सद्यस्थितीत अनेक स्कूल बसेसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरले जातात, तसेच वाहनांच्या देखभालीसंदर्भातही प्रश्नचिन्ह निर्माण होते. परिवहन विभागाने आणि आरटीओने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व बसेसची कसून तपासणी करणे, त्या सुसज्ज आहेत की नाही याची खात्री करणे, आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 7,474
अपघात स्कूल बस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar09/10/20260

आजचे राशीभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला रासेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची…

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.