Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ठाकरे बंधू दोन दशकांनंतर एकत्र, हिंदी सक्ती रद्द झाल्याच्या जल्लोषात सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका… बाळासाहेबांना जे जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं! राज ठाकरे; आमच्या दोघांतील ‘अंतरपाट’ अनाजी पंतांनी दूर केला एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी! उद्धव ठाकरे
राजकारण

ठाकरे बंधू दोन दशकांनंतर एकत्र, हिंदी सक्ती रद्द झाल्याच्या जल्लोषात सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका… बाळासाहेबांना जे जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं! राज ठाकरे; आमच्या दोघांतील ‘अंतरपाट’ अनाजी पंतांनी दूर केला एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी! उद्धव ठाकरे

या विजयी मेळाव्याने केवळ हिंदी सक्ती रद्द झाल्याचा आनंद साजरा केला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या संभाव्य पुनर्मिलनाची आणि मराठी अस्मितेच्या राजकारणाची नांदी देखील दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/07/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज- मुंबई

जवळपास दोन दशकांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, एकाच मंचावर एकत्र आले. पहिलीपासून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे महायुती सरकारने रद्द केल्यानंतरच्या विजयी मेळाव्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी शनिवारी (५ जुलै) वरळी डोम येथे हा भव्य मेळावा आयोजित केला होता. या ऐतिहासिक क्षणी दोन्ही नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकजूट दर्शवली.

राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला: “बाळासाहेबांना जे जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं!”

या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता, पण नुसतं मोर्चाच्या चर्चेनंतर माघार घ्यावी लागली. आजचा हा मेळावा शिवतीर्थावर मैदानावर व्हायला हवा होता, मैदान ओसंडून वाहिलं असतं,” असे म्हणत त्यांनी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली. सर्वात लक्षवेधी विधान करताना, राज ठाकरे म्हणाले, “मला आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं.” या विधानाने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आणि उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ पिकला.

राज ठाकरे यांनी आपल्या मुलांच्या इंग्रजी शाळेतील शिक्षणाचा संदर्भ देत, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे देखील इंग्रजी शाळेत शिकले होते, परंतु त्यांचा मराठी अभिमान कणभरही कमी झाला नाही, असे स्पष्ट केले. मराठी भाषेसाठी यापुढेही ही एकजूट कायम राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

उद्धव ठाकरेंकडून भाजपावर हल्लाबोल: “निवडणुकीसाठी नाही, तर मराठीसाठी एकत्र आलो!”

राज ठाकरेंनंतर व्यासपीठावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही निवडणुकीसाठी नाही, तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत.” अनेक वर्षांनी राजसोबत व्यासपीठावर भेट झाल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा ‘सन्माननीय राज ठाकरे’ असा उल्लेख केला.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आणि राज ठाकरे यांच्यातील दुरी कमी होण्यामागे ‘अनाजी पंत’ जबाबदार असल्याचे सांगत, अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. “आमच्या दोघांतील ‘अंतरपाट’ अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी,” असे म्हणत त्यांनी भविष्यातही एकजुटीने काम करण्याचे संकेत दिले.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर पलटवार करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मला आज कल्पना आहे, अनेक बुवा महाराज बिझी आहेत, कोण लिंबू कापतंय? कोण रेडा कापतोय? माझ्या आजोबांनी या भोंदूपणा विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं यांचं काम आहे, आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ. तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसता, तर कुठे असता तुम्ही. मधल्या काळात यांनी सुरू केलं होतं उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत.”

मेळाव्याला सुरुवात होताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळी डोममध्ये एकत्रित थाटात एन्ट्री घेतली. ठाकरे घराण्याचे गाणे वाजत असताना, दोन्ही भावांनी एकाचवेळी मंचावर प्रवेश केला. या क्षणी त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले. हा क्षण ठाकरे कुटुंब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावनिक आणि एकतेचे प्रतीक होता.

या विजयी मेळाव्याने केवळ हिंदी सक्ती रद्द झाल्याचा आनंद साजरा केला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या संभाव्य पुनर्मिलनाची आणि मराठी अस्मितेच्या राजकारणाची नांदी देखील दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,225
उद्धव ठाकरे मेळावा राज ठाकरे हिंदी सक्ती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.