Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर न्यायालयाने एका आरोपीला मारहाणीसाठी दोषी ठरवत दिली ‘ही’ शिक्षा तर इतरांना केले दोषमुक्त
न्यायालय

संगमनेर न्यायालयाने एका आरोपीला मारहाणीसाठी दोषी ठरवत दिली ‘ही’ शिक्षा तर इतरांना केले दोषमुक्त

न्यायाधीश भेंडे यांनी यावेळी सरकारी वकील प्रणव भामरे आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या संदर्भात निकाल दिला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर येथील ४ थे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जि. व. भेंडे यांच्या न्यायालयाने संगमनेर शहरातील एका मारहाण प्रकरणी नुकताच निकाल दिला असून यात एका आरोपीला दोषी ठरवत अन्य दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे.

२४ जून, २०१५ रोजी राजाराम लक्ष्मण कढणे (तक्रारदार) यांनी संगमनेर बसस्थानकाजवळील गणेश फ्रूट्स येथून आंबे खरेदी केले होते. त्यातील दोन आंबे खराब निघाल्याने ते परत करण्यासाठी ते पुन्हा दुकानात गेले असता, अमोल अशोक भवर याने आंबे परत घेण्यास नकार दिला आणि पैसे देण्यासही नकार दिला. त्यानंतर भवर यांच्यासह तिघा जणांनी तक्रारदाराला शिवीगाळ केली. आयुब कादर इनामदार याने तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिली. तर तौफिक आयुब इनामदार याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, या मारहाणीत तक्रारदाराचे पुढील खालचे दोन दात पडले आणि शेजारील दोन दात हलू लागले. या घटनेनंतर २५ जून, २०१५ रोजी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

याप्रकरणी अमोल अशोक भवर, तौफिक आयुब इनामदार आणि आयुब कादर इनामदार या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी रफिक अहमद अब्दुल कादर पठाण यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीं विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जि. व. भेंडे यांच्यासमोर झाली. अभियोग पक्षाने या खटल्यात तक्रारदार राजाराम लक्ष्मण कढणे, पंच तुषार गोरक्षनाथ कुळधरण व कैलासनाथ रामेश्वर सोमाणी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव संभाजी घोडके, साक्षीदार प्रवीण तानाजी वर्पे आणि तपासी अंमलदार रफिक अहमद अब्दुल कादर पठाण यांच्या साक्षी नोंदवल्या.

न्यायाधीश भेंडे यांनी यावेळी सरकारी वकील प्रणव भामरे आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या संदर्भात निकाल दिला. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आरोपी तौफिक आयुब इनामदार याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ अन्वये (स्वेच्छेने दुखापत पोहोचवणे) दोषी ठरवण्यात आले असून त्याला न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत न्यायालयीन कोठडीची शिक्षा आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास भोगावा लागणार आहे. 

यातील अन्य दोन आरोपी अनुक्रमे अमोल अशोक भवर आणि आयुब कादर इनामदार यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ अन्वये लावण्यात आलेल्या आरोपातून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २४८(१) अन्वये निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. तर तक्रारदार राजाराम लक्ष्मण कढणे यांना दंडाच्या रकमेतून पाचशे रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,421
न्यायालय मारहाण शिक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.