Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धक्कादायक: संगमनेरमध्ये गटारातील विषारी वायूमुळे दुर्घटना, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू तर दोघे जखमी; पालिका कामाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
अपघात

धक्कादायक: संगमनेरमध्ये गटारातील विषारी वायूमुळे दुर्घटना, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू तर दोघे जखमी; पालिका कामाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

घटनेची माहिती मिळताच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, निखिल पापडेजा आदींसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/07/2025Updated:10/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज (गुरुवार, ११ जुलै) एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलशेजारी गटारात काम करत असताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली असून, कामाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अतुल रतन पवार असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव असून प्रकाश वसंत कोटकर व रियाज जावेद पिंजारी अशी जखमींची नावे असल्याची व जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपालिकेने हाती घेतलेल्या सांडपाणी व्यवस्थापन (STP) प्रकल्पांतर्गत शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्याचे काम सुरू आहे. आज कोल्हेवाडी रोडवरील कामादरम्यान एका कर्मचाऱ्याला गटारात श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या काही कर्मचाऱ्यांचा आणि स्थानिक नागरिकांचाही गटारात श्वास कोंडला गेला. यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला.

घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, इतर पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले. गटारात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तिघांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची तर अन्य दोघेजण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, निखिल पापडेजा आदींसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

या गंभीर दुर्घटनेमुळे संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पाच्या कामातील सुरक्षा उपाययोजनांवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भूमिगत गटार कामादरम्यान आवश्यक सुरक्षा मानके पाळली गेली होती का, याबाबत सखोल चौकशीची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे भूमिगत कामांच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणी कोणावर गुन्हा दाखल होतो याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,947
अपघात एसटीपी प्लांट तरुणाचा मृत्यू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.