Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगरपालिकेचे मुख्याधिकारी 6 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
गुन्हेगारी

नगरपालिकेचे मुख्याधिकारी 6 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

चव्हाण यांच्या घराची तपासणी देखील करण्यात आली आहे. एसीबीचे अधिकारी पुढील तपास करत आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 11, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज: 

महायुती सरकारच्या कार्यकाळात दिवसेंदिवस लाचखोरीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. गलेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी कोणत्याही कामाच्या मोबदल्यात हल्ली लाखो रुपयांची लाच सर्वसामान्यांकडून मागत असल्याने या अधिकाऱ्यांना भिकेचे डोहाळे लागल्याचे दिसत आहे. 

बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 6 लाख रुपयांची लाच घेताना गुरुवारी रंगेहाथ पकडले. सिमेंट रस्त्याच्या बिलापोटी आणि अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी कंत्राटदाराकडे एकूण 12 लाख रुपयांची मागणी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शासनाच्या नगर उत्थान योजनेंतर्गत सिमेंट रस्त्याच्या सुमारे 2 कोटी रुपयांच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी मुख्याधिकारी चव्हाण यांनी 3 टक्के दराने 6 लाख रुपयांची मागणी केली होती. याव्यतिरिक्त, उर्वरित रस्त्यांच्या कामांमधील अडथळे दूर करण्यासाठी, म्हणजेच रस्त्यांच्या बाजूचे अतिक्रमण काढण्यासाठी, त्यांनी आणखी 6 लाख रुपयांची मागणी केली होती. अशा प्रकारे, चव्हाण यांनी कंत्राटदाराकडे एकूण 12 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

कंत्राटदाराने यासंदर्भात एसीबीकडे तक्रार केल्यानंतर, एसीबीने सापळा रचला. चंद्रकांत चव्हाण हे 6 लाख रुपये स्वीकारत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच, चव्हाण यांच्या घराची तपासणी देखील करण्यात आली आहे. एसीबीचे अधिकारी पुढील तपास करत आहे.

या घटनेमुळे प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारकडून केवळ निलंबनाची कारवाई न करता कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,103
मुख्याधिकारी लाचखोरी लाचलुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

संगमनेरमध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून मोठे आवाज काढणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई, दुचाकी जप्त

June 1, 2026

समनापूर प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी जुनेद आणि अरबाज गजाआड; संगमनेर पोलिसांची पुण्यात धडाकेबाज कारवाई

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

By अनंत पांगारकरJune 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रित्या चालणाऱ्या मटका अड्ड्यांवर…

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

आज गुरुवार, ४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.