Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026

गुरुवार, ०८ ऑक्टोंबर —- जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुण्याच्या लॅबचा रिपोर्ट संगमनेरच्या सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळात भेसळ! तक्रारदाराने चार वेळा पत्र व्यवहार करुनही अन्न व औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष, १५ ऑगस्टपासून उपोषण
महाराष्ट्र संवाद विशेष

पुण्याच्या लॅबचा रिपोर्ट संगमनेरच्या सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळात भेसळ! तक्रारदाराने चार वेळा पत्र व्यवहार करुनही अन्न व औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष, १५ ऑगस्टपासून उपोषण

चार वेळा पत्रव्यवहार करूनही अन्न व औषध प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. तसेच, यापूर्वी संगमनेरमध्ये समोर आलेल्या ७ ते ८ प्रकरणांमध्ये केवळ दिखाऊ कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेरमधील मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्या सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळ या उत्पादनात भेसळ असल्याच्या पुण्याच्या कियान लॅबच्या अहवालाने खळबळ उडवून दिली आहे. या अहवालानुसार, गुळाच्या तपशीलामध्ये तफावत आढळली असून, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) घालून दिलेल्या नियमांनुसार त्याचे मानांकन नसल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान या संदर्भात वारंवार अहिल्यानगरच्या अन्न औषध प्रशासनाशी संपर्क करत कारवाईची मागणी करून देखील अन्न औषध प्रशासनाकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला जात आहे.

घुलेवाडी येथील रहिवासी शंकर रावसाहेब ढमाले यांनी २८ मे २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. ढमाले यांनी १६ मे २०२५ रोजी सागर किराणा येथून गुळ खरेदी केला होता. हा गुळ खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या, जुलाब आणि पोटात तीव्र वेदना झाल्या. यापूर्वी २२ एप्रिल २०२५ रोजी देखील त्यांना अशाच प्रकारची विषबाधा झाली होती, यामुळे त्यांना तीन दिवस खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन्ही वेळेस गुळ खाल्ल्यानंतरच त्रास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पुणे येथील कियान लॅबने ४ जुलै २०२५ रोजी गुळाच्या नमुन्यांची तपासणी केली असता या लॅबच्या अहवालात गुळात भेसळ झाल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान शंकर ढमाले यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चार वेळा पत्रव्यवहार करूनही अन्न व औषध प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. तसेच, यापूर्वी संगमनेरमध्ये समोर आलेल्या ७ ते ८ प्रकरणांमध्ये केवळ दिखाऊ कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. ढमाले यांनी २७ मे, १७ जून आणि २६ जून रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली होती. २६ जून रोजी पाठवलेल्या पत्रात, त्यांनी अन्न व औषध प्रशासनाने सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळ कंपनीऐवजी सागर प्रोव्हिजन दुकानावर छापा टाकत संबंधित गुळाच्या व्यापाऱ्याला पाठीशी घातले.

ढमाले यांनी मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्यावर केवळ गुळातच नव्हे, तर इतर अनेक किराणा मालात भेसळ केल्याचा आरोप केला आहे. यात जनावरांसाठी वापरली जाणारी खराब गुळ पावडर शुद्ध नैसर्गिक गुळाच्या नावाने विकणे, ब्रँडेड तांदळात रेशनचा तांदूळ मिसळणे, ब्रँडेड बेसन पिठाच्या नावाखाली स्थानिक बेसन पीठ विकणे, आणि कडधान्ये व डाळींना कृत्रिम रंग व स्वाद देण्यासाठी रसायनांचा वापर करणे या बाबींचा समावेश आहे.

यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी करणार असल्याचे शंकर ढमाले यांनी सांगितले. प्रशासनाने पुढील सात दिवसांत कारवाई न केल्यास, १५ ऑगस्ट २०२५ पासून संविधानिक मार्गाने आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला असून भविष्यात आपल्याला कोणतीही शारीरिक इजा झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणांची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्ज केला असून, अद्याप त्याचे उत्तर मिळालेले नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,958
भेसळ शंकर ढमाले सिद्धी गुळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

By Annant Ppangarkar08/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोव्यात निधन झाले.…

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026

गुरुवार, ०८ ऑक्टोंबर —- जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

08/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.