Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर येथील गटार दुर्घटनेप्रकरणी विधानसभेत आवाज उचलला; अपूर्ण काम असताना गटार जोडणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी… बघा तांबे नेमकं काय म्हणाले!
महाराष्ट्र संवाद विशेष

आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर येथील गटार दुर्घटनेप्रकरणी विधानसभेत आवाज उचलला; अपूर्ण काम असताना गटार जोडणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी… बघा तांबे नेमकं काय म्हणाले!

तांबे म्हणाले, गटार साफसफाईसाठी माणसांना गटारात उतरवणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि या सभागृहात यावर यापूर्वीही अनेकवेळा चर्चा झाली आहे. तरीही अशा घटना वारंवार घडत आहेत, हे दुर्दैवी आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/07/2025Updated:11/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, ११ जुलै २०२५: 
आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संगमनेर येथे भुयारी गटार साफ करताना विषारी वायूमुळे दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात मांडली. याप्रकरणी संबंधित ठेकेदारांवर कारवाई झाली असली तरी देखील अपूर्ण काम असताना गटार जोडणाऱ्या आणि या घटनेला जबाबदार असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी तांबे यांनी यावेळी लावून धरली.
आमदार तांबे यांनी संगमनेर मधील दुर्दैवी घटने संदर्भात सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. संगमनेर भुयारी गटार योजना २०१२ मध्ये मंजूर झाली होती, परंतु एसटीपीच्या जागेच्या वादामुळे हे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण होते. काल, नगरपालिकेने अनधिकृतपणे जोडलेल्या गटाराची साफसफाई करत असताना, ठेकेदाराचा कर्मचारी अतुल पवार गटारात उतरला आणि विषारी वायूमुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला रियाज पठाण नावाचा दुसरा तरुणही या घटनेत बळी पडला. ही घटना अत्यंत गंभीर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे द्योतक असल्याचे तांबे यांनी नमूद केले.
https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2025/07/VID-20250711-WA0052.mp4
या दुर्घटनेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढत आमदार तांबे म्हणाले, गटार साफसफाईसाठी माणसांना गटारात उतरवणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि या सभागृहात यावर यापूर्वीही अनेकवेळा चर्चा झाली आहे. तरीही अशा घटना वारंवार घडत आहेत, हे दुर्दैवी आहे.
त्यांनी सरकारकडे मागणी केली की, या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर, ज्या नगरपालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे अपूर्ण काम असतानाही गटार अनधिकृतपणे जोडले, त्यांच्यावरही कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
महत्त्वाचे म्हणजे, तांबे यांनी यावेळी मृत कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची मागणी केली. त्यांनी सांगितले की, या निष्पाप कामगारांच्या मृत्यूची भरपाई कोणीही करू शकत नाही, परंतु त्यांच्या कुटुंबियांना जगण्यासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे, प्रत्येक मृतकाच्या कुटुंबियांना संगमनेर नगरपालिकेकडून प्रत्येकी ५० लाख रुपयांची तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी. जर नगरपालिका ही भरपाई देऊ शकली नाही, तर मुख्यमंत्री सहायता निधीतून सरकारने ती तातडीने उपलब्ध करून द्यावी.
आमदार तांबे यांनी सरकारला या घटनेची गंभीर दखल घेऊन मृतकांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही सभागृहात देण्याची विनंती केली.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,481
आर्थिक मदत कारवाई दुर्दैवी घटना पावसाळी अधिवेशन विधान परिषद सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.