Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या मागणीनंतर निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाणी सुरु, शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
पाण्याचे राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या मागणीनंतर निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाणी सुरु, शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

बाळासाहेब थोरात यांनी ८ जुलै २०२५ रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहून वाहून जाणारे पाणी उजव्या व डाव्या कालव्यांद्वारे सोडण्याची मागणी केली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मागणीनंतर निळवंडे धरणाच्या उजव्या व डाव्या दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पाणीटंचाईने त्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावर्षी भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने जुलैच्या सुरुवातीलाच दोन्ही धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक झाली. हे पाणी नदीमार्गे अगदी शेवटपर्यंत पोहोचले असले तरी, धरणाच्या लाभ क्षेत्रात मात्र पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

याच पार्श्वभूमीवर, निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी ८ जुलै २०२५ रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहून वाहून जाणारे पाणी उजव्या व डाव्या कालव्यांद्वारे सोडण्याची मागणी केली होती. यामुळे बंधारे आणि नाला बंडिंग भरून घेता येतील, तसेच परिसरातील शेतकऱ्यांनाही याचा लाभ होईल, असे थोरात यांनी पत्रात नमूद केले होते.

शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोरात यांच्या मागणीची दखल घेत, जलसंपदा विभाग आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १५ जुलै रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आज निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांमधून ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले असून, भविष्यात हे पाणी आणखी वाढवण्यात येणार आहे.

सध्या संगमनेर तालुक्यासह धरणाच्या लाभक्षेत्रात अत्यंत कमी पाऊस असल्याने, निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्यातून आलेल्या या पाण्यामुळे अकोले, संगमनेर, राहता, कोपरगाव, राहुरी, आणि सिन्नर या तालुक्यांमधील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण सांगळे यांनी सांगितले की, सत्ता असो वा नसो, बाळासाहेब थोरात यांनी कायम शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले आहे. त्यांची ओळख लोकनेते म्हणून राज्यात आहे. निळवंडे धरण व कालवे त्यांनी १८२ गावांकरिता पूर्ण केले आहेत. या भागातील गावांच्या अडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कमी पाऊस याची त्यांना पूर्ण माहिती असून, त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतली आहे. राजकारण विरहित शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहणारे ते नेते आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 925
निळवंडे धरण पाणी बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.