Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, कुंभमेळ्याच्या काळात शिर्डी विमानतळावर लहान विमानांचे पार्किंग
बैठक

शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, कुंभमेळ्याच्या काळात शिर्डी विमानतळावर लहान विमानांचे पार्किंग

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे यांनी यावेळी दोन्ही विमानतळांच्या कामांची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/07/2025Updated:17/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

मुंबई, १७ जुलै: 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांचा आढावा घेतला. आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शिर्डी विमानतळाचे नूतनीकरण आणि विस्तारीकरण लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

विधानभवनात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शिर्डी विमानतळावर नवीन एटीसी इमारत, नवीन एकात्मिक मालवाहतूक इमारत आणि नवीन टर्मिनल इमारतीची कामे प्रस्तावित आहेत. ही कामे सध्या संथगतीने सुरू असून, ती कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ वापरण्याचे आणि खरेदी व स्ट्रक्चरल डिझाइनची कामे एका आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाजवळ असल्याने लहान विमानांच्या पार्किंगसाठी शिर्डी विमानतळाचा वापर होऊ शकतो. यासाठी आवश्यकतेनुसार आणखी जमीन संपादन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

पुरंदर विमानतळासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून, आता भूसंपादन प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हे विमानतळ सुरू झाल्यावर महाराष्ट्रातील विमानसेवा मोठ्या प्रमाणात वाढेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरू व्हावे अशी सूचना केली. तसेच, या विमानतळावर मोठ्या विमानांच्या लँडिंगची आणि हँगरची व्यवस्था असावी असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे यांनी यावेळी दोन्ही विमानतळांच्या कामांची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 624
देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विमानतळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; संगमनेर तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजना नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा: मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश… उपअभियंता सक्तीच्या रजेवर, तर योजनांचे होणार थर्ड पार्टी ऑडिट

07/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

निळवंडेच्या पाण्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार: पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील चिंचोली गुरव उपसा सिंचन प्रकल्पासाठी पाच कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

23/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.