Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

26/08/2026

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सुनेने बळकावलेली जमीन अखेर सासू-सासऱ्यांना परत मिळाली; न्यायाधिकरणाचा महत्त्वाचा निर्णय
न्यायालय

सुनेने बळकावलेली जमीन अखेर सासू-सासऱ्यांना परत मिळाली; न्यायाधिकरणाचा महत्त्वाचा निर्णय

सध्या जिल्हा व सत्र न्यायालयात चालू असलेल्या अपील क्रमांक १९/२०२४ च्या निकालाच्या अधीन हा आदेश राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

अहिल्यानगर, दि. १९: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे एक महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे पीठासीन अधिकारी तथा श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी येवती (ता. श्रीगोंदा) येथील एका वृद्ध दांपत्याला त्यांची सुनेने बळकावलेली वडिलोपार्जित शेतजमीन परत मिळवून देण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे तहसीलदारांना ही जमीन पुन्हा मूळ मालकांच्या नावे नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

येवती येथील ज्ञानदेव दिनकर आढाव आणि त्यांच्या पत्नी अंजनाबाई आढाव या वृद्ध दांपत्याने न्यायाधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, सुमारे २० वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचे, विजय आढाव यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची सून, जयश्री आढाव हिने त्यांच्या अडाणीपणाचा आणि वृद्धत्वाचा गैरफायदा घेत प्रतिज्ञापत्र करून वडिलोपार्जित शेतजमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. जमीन नावावर होताच तिने सासू-सासऱ्यांना घरातून बाहेर काढले आणि त्यांची कोणतीही जबाबदारी घेतली नाही. परिणामी, या वृद्ध दांपत्याला आपल्या मुलींच्या घरी आश्रय घेऊन अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत होते, असे त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले होते.

या प्रकरणी, सून जयश्री आढाव हिने मात्र ही जमीन आपल्याला कायदेशीर वाटपातून मिळाल्याचा दावा करत वृद्धांच्या आरोपांना विरोध केला. यापूर्वीही अशाच प्रकारच्या बाबींवर आपण न्यायालयीन लढा दिल्याचे तिने सांगितले.

दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि सादर केलेले पुरावे तपासल्यानंतर न्यायाधिकरणाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. ज्येष्ठ नागरिक (देखभाल व कल्याण) कायदा २००७ च्या कलम २३ नुसार, सुनेच्या नावे झालेले जमिनीचे हस्तांतरण अवैध ठरवण्यात आले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या उर्मिला दीक्षित विरुद्ध सुनील शरद दीक्षित या प्रकरणातील निर्णयाचा संदर्भ देत, ही वडिलोपार्जित शेतजमीन परत ज्ञानदेव आढाव यांच्या नावे नोंद करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले.

सध्या जिल्हा व सत्र न्यायालयात चालू असलेल्या अपील क्रमांक १९/२०२४ च्या निकालाच्या अधीन हा आदेश राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. श्रीगोंदा येथील या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे वृद्ध नागरिकांच्या मालमत्तेवरील हक्कांना न्याय मिळाला असून, भविष्यात अशा प्रकरणांसाठी हा आदेश एक मार्गदर्शक ठरणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,618
जमीन ज्येष्ठ नागरिक (देखभाल व कल्याण) कायदा निर्णय श्रीगोंदा श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

30/07/2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

22/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

By Annant Ppangarkar26/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कर्म करणे ही जीवनाची अपरिहार्यता आहे; मात्र त्या…

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.