Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात राजकीय वादळ: तीन तलाठी आणि दोन मंडळ अधिकारी निलंबित, आत्तापर्यंत १० महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई; अधिकाऱ्यांना मात्र अभय कोणाचे?
प्रशासन

संगमनेरात राजकीय वादळ: तीन तलाठी आणि दोन मंडळ अधिकारी निलंबित, आत्तापर्यंत १० महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई; अधिकाऱ्यांना मात्र अभय कोणाचे?

या कारवाईला आता राजकीय रंग येऊ लागला आहे आणि महसूल विभागात नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. या निलंबनामुळे संगमनेरमधील भूखंड व्यवहार आणि महसूल प्रशासन अधिक चर्चेत आले आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाचे आणखी पैलू समोर येण्याची शक्यता आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर तालुक्यात प्रशासकीय अनियमितता आणि राजकीय हस्तक्षेपावरून मोठे वादळ निर्माण झाले आहे. शासनाच्या तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून येलो आणि ग्रीन झोनमधील जमिनींचे बेकायदेशीर तुकडे पाडल्याप्रकरणी दोन मंडळ अधिकारी आणि तीन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीही अशीच कारवाई करून पाच जणांचे निलंबन करण्यात आले होते. आतापर्यंत दहा जणांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळल्याने या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली असून, यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, मंडल अधिकारी बाबाजी जेडगुले (समनापुर) व इराप्पा काळे (साकुर), तलाठी रोहिणी कोकाटे, तलाठी आलोकचंद्र चिंचुलकर, तलाठी धनराज राठोड या पाच महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या महाराष्ट्र जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या कायद्याचे (अधिनियम ११४७) उल्लंघन केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्रात लहान तुकड्यांमध्ये जमिनीचे विभाजन करण्यास मनाई आहे, जेणेकरून मोठ्या जमिनींचे एकत्रीकरण होऊन शेतीचे संरक्षण व्हावे. मात्र, या अधिकाऱ्यांनी ग्रीन झोनमधील जमिनींचे बेकायदेशीर तुकडे पाडले आणि नियमांचे उल्लंघन करून रेखांकन केले, तसेच कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही, असा आरोप आहे.

या कारवाईमुळे महसूल विभागात असंतोष निर्माण झाला आहे. विशेषतः, आतापर्यंत केवळ दहा महसूल कर्मचाऱ्यांवरच कारवाई झाली असून, यात काही मोठ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे पुढे येत आहे. या अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय असे उद्योग होऊ शकत नाही असे बोलले जात असून अधिकाऱ्यांना कारवाईतून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

जिल्ह्यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने एका महिला तलाठ्याचे निलंबन रद्द करण्यात आल्याची माहिती चर्चेत आली असून त्यामुळे या कारवाईला आता राजकीय रंग येऊ लागला आहे आणि महसूल विभागात नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. या निलंबनामुळे संगमनेरमधील भूखंड व्यवहार आणि महसूल प्रशासन अधिक चर्चेत आले आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाचे आणखी पैलू समोर येण्याची शक्यता आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,915
तलाठी निलंबन मंडळ अधिकारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.