Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पोलिस दलात खळबळ: लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली पोलीस नाईकाविरोधात एसपी आणि लाच लुचपतकडे गंभीर तक्रार
गुन्हेगारी

संगमनेर पोलिस दलात खळबळ: लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली पोलीस नाईकाविरोधात एसपी आणि लाच लुचपतकडे गंभीर तक्रार

पुढील तपासात काय सत्य समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलाची प्रतिमा डागाळण्याची शक्यता असून, त्यामुळे तात्काळ आणि पारदर्शक कारवाईची मागणी जोर धरत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

संगमनेर, प्रतिनिधी: 

अहिल्यानगरच्या एलसीबी मधील पोलीस उपनिरीक्षकासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्याच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच संगमनेर येथे एका धक्कादायक घटनेने पोलीस दलात खळबळ उडवून दिली आहे. संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक धनंजय महाले यांच्यावर गंभीर स्वरूपाचे लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. 

संगमनेर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीने हे प्रकरण सध्या संगमनेरमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.

काय आहे प्रकरण?

१९ जानेवारी २०२३ रोजी कतारी यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये एका फसवणुकीच्या प्रकरणी लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर कारवाई करण्याच्या नावाखाली पोलीस नाईक धनंजय महाले यांनी अमर कतारी यांच्याशी संपर्क साधला. कतारी यांच्या आरोपानुसार, महाले यांनी कागदपत्रांच्या खर्चासाठी आणि ‘कायदेशीर कारवाई’ करण्याच्या बहाण्याने तब्बल चाळीस हजार रुपयांची त्यांच्याकडे मागणी केली. सुरुवातीला कतारी यांनी रोख वीस हजार रुपये दिले, तर उर्वरित वीस हजार रुपये कारवाई पूर्ण झाल्यावर देण्याचे ठरले.

पैसे घेऊनही कारवाई नाही, उलट धमक्या!

कतारी यांच्या म्हणण्यानुसार, २० एप्रिल २०२३ रोजी धनंजय महाले यांनी त्यांना संगमनेरमधील एका हॉटेलजवळ बोलावून आणखी दहा हजार रुपये घेतले. अशा प्रकारे, एकूण ३०,००० रुपये रोख रक्कम दिल्यानंतरही महाले यांनी कतारी यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही. याउलट, कतारी यांनी वारंवार विचारणा केल्यावर महाले यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली आणि नंतर धमक्या देण्यास सुरुवात केली. कतारी यांनी ६ जून २०२४ रोजी धनंजय महाले यांना पुन्हा संपर्क करून कारवाईबाबत विचारले असता, महाले यांनी कतारी यांना पोलीस स्टेशनबाहेर बोलावून धमक्या दिल्याचा गंभीर आरोप आहे.

कतारी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, धनंजय महाले यांनी केवळ पैशांची मागणी केली नाही, तर शासकीय कर्तव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्यांची फसवणूक केली आहे. हा लाचखोरीचा आणि पदाचा गैरवापर केल्याचा स्पष्ट प्रकार असल्याचे म्हटले आहे.

या संदर्भात, त्यांनी आपल्या तक्रारीसोबत १९ जानेवारी २०२३ रोजी दाखल केलेल्या मूळ तक्रारीची झेरॉक्स प्रत, महाले यांच्यासोबतच्या व्हॉट्सअँप चॅटिंगचे स्क्रीनशॉट आणि फोन कॉलसंबंधीचे तपशील (स्क्रीनशॉट) पुरावा म्हणून सादर केले आहेत.

कतारी यांच्या या गंभीर आरोपांमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे सामान्य जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर असताना, असे आरोप थेट पोलिसांवरच होत असल्याने प्रशासनावर दबाव वाढला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कतारी यांच्यासह स्थानिक नागरिक करत आहेत. पुढील तपासात काय सत्य समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलाची प्रतिमा डागाळण्याची शक्यता असून, त्यामुळे तात्काळ आणि पारदर्शक कारवाईची मागणी जोर धरत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,922
अमर कतारी धनंजय महाले पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

By Annant Ppangarkar17/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील राजापूरच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड…

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.