Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू: नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!
प्रशासन

भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू: नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

पावसाचे प्रमाण पाहता, पुढील काही दिवस ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

अहिल्यानगर/संगमनेर: 

एक महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी समोर येत आहे. संततधार पावसामुळे भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून, धरणांमधून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना विशेषतः प्रवरा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी नदीपात्रात न उतरण्याचे आणि आपल्या मालमत्तेची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

भंडारदरा धरणातून विसर्ग सुरू- 

अहिल्यानगर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, २६ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता भंडारदरा धरणातील एकूण पाणीसाठा ९१६५ दशलक्ष घनफूट (दलघफु) इतका झाला होता. धरणाच्या जलाशय परिचालन सूची (ROS) नुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक असल्याने, त्याच दिवशी संध्याकाळी ६.०० वाजता भंडारदरा धरणातून ४००० क्युसेक्स विसर्गाने पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

निळवंडे धरणाचा विसर्ग वाढवला- 

तर, संगमनेरच्या उर्ध्व प्रवरा धरण विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, २७ जुलै २०२५ रोजी निळवंडे धरणातील विसर्ग वाढवून १०१४६ क्युसेक्स करण्यात आला आहे. दोन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने प्रवरा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.

नदीकाठच्या गावांना आवाहन आणि दक्षतेचा इशारा- 

या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, कार्यकारी अभियंत्यांनी नदीकाठच्या गावांना जाहीर आवाहन केले आहे. नागरिकांनी आपली चल मालमत्ता, चीजवस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारे आणि इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावीत. कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, कुठलीही जीवित किंवा वित्त हानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी तयार राहावे, असेही सांगण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण पाहता, पुढील काही दिवस ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,223
निळवंडे धरण भंडारदरा धरण विसर्ग सतर्कतेचा इशारा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

निळवंडेच्या पाण्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार: पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील चिंचोली गुरव उपसा सिंचन प्रकल्पासाठी पाच कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

23/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.