Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दंडकारण्य अभियानाचा १९ वा शुभारंभ मालदाड येथे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती
सामाजिक

दंडकारण्य अभियानाचा १९ वा शुभारंभ मालदाड येथे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती

दंडकारण्य अभियानाचा या वर्षीचा शुभारंभ शनिवारी, २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मायंबा डोंगर तसेच कानिफनाथ मंदिर, मालदाड येथे होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/07/2025Updated:01/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

संगमनेर, प्रतिनिधी: 

सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानाचा १९ वा शुभारंभ शनिवारी, (२ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता मालदाड येथील कानिफनाथ मंदिर डोंगर येथे होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली २००६ पासून अमृत उद्योग समूह आणि विविध सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे पर्यावरण संवर्धनाचे दंडकारण्य अभियान राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत दरवर्षी लाखो वृक्षांचे रोपण केले जाते, ज्यामुळे अनेक उजाड डोंगर आता हिरवेगार दिसू लागले आहेत. याव्यतिरिक्त, तालुक्यामध्ये वृक्ष संवर्धनाची संस्कृती वाढली असून, महिलांनी घरांच्या आसपास परसबागांसह वृक्षांची लागवड केली आहे.

या अभियानाची राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली असून, तालुक्यातील सर्व नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे ही एक मोठी लोकचळवळ ठरली आहे.

दंडकारण्य अभियानाचा या वर्षीचा शुभारंभशनिवारी, २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मायंबा डोंगर तसेच कानिफनाथ मंदिर, मालदाड येथे होणार आहे.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, इंद्रजित थोरात, पांडुरंग पाटील घुले, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, बाबा ओहोळ, हौशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, राजेंद्र कडलग, प्रा. बाबा खरात, विश्वास मुर्तडक, सरपंच गोरख नवले, अर्चना बालोडे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, जावेद शेख, हैदर अली यांच्यासह मालदाड आणि पंचक्रोशीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमासाठी मालदाड, सोनोशी, घुलेवाडी, सायखिंडी, सुकेवाडी, वेल्हाळे, निमोन परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दंडकारण्य अभियान समिती, ग्रामपंचायत मालदाड आणि मालदाड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 437
दंडकारण्य अभियान दुर्गाताई तांबे बाळासाहेब थोरात शुभारंभ सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

By Annant Ppangarkar29/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  हिक्किम: जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेल्या हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध…

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.