Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महसूल कर्मचाऱ्यांनी लोकांचा विश्वास जिंकावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
राजकारण

महसूल कर्मचाऱ्यांनी लोकांचा विश्वास जिंकावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निसर्गाच्या आपत्तीच्या काळात महसूल विभागाचे कर्मचारीच सर्वात आधी मदत करतात, त्यामुळे त्यांचे काम अधिक महत्त्वाचे ठरते
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, शिर्डी: 

महसूल विभागाने अधिक संवेदनशीलतेने काम करत सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

राहाता येथे ‘महसूल सप्ताह – २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, तहसीलदार अमोल मोरे, राहाता नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना विखे पाटील यांनी त्यांच्या महसूल मंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही उपक्रमांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, महसूल विभागाने ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ सारख्या अभिनव उपक्रमातून सैनिकांचे प्रश्न सोडवले. त्याचबरोबर खंडकऱ्यांच्या जमिनींचे प्रश्न मार्गी लावणे, गायरान जमिनींचा वापर घरकुलांसाठी करणे, आणि भोगवटा २ मधील नोंदी भोगवटा १ मध्ये करणे असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या सर्व सेवा अधिक सुलभ करण्यासाठी त्या ऑनलाइनही उपलब्ध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

निसर्गाच्या आपत्तीच्या काळात महसूल विभागाचे कर्मचारीच सर्वात आधी मदत करतात, त्यामुळे त्यांचे काम अधिक महत्त्वाचे ठरते, असेही ते म्हणाले. तसेच, शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यांकडे लक्ष द्यावे आणि ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे स्वतःहून काढावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, काही लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभ, आणि जमिनीशी संबंधित विविध आदेश व कागदपत्रे पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली. या सप्ताहात महसूल सेवा नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी सांगितले. अनेक सेवा आता ऑनलाइन उपलब्ध असून त्यात आणखी सेवांचा समावेश करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 405
महसूल सप्ताह राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.