Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर पोलिसांकडून बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

अहिल्यानगर पोलिसांकडून बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी पान टपरी चालकाच्या सतर्कतेमुळेच हे मोठे रॅकेट उघडकीस आले. त्याने दाखवलेल्या सजगतेमुळे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत त्याचे कौतुक केले आणि त्याचा सत्कार करणार असल्याचे सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, अहिल्यानगर: 

अहिल्यानगर तालुका पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ८८ लाख २० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये बनावट नोटा, त्यांना तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशिनरी आणि एक वाहन यांचा समावेश आहे. या प्रकरणी अहिल्यानगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते आपल्या पथकासह हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना आंबिलवाडी शिवारात दोन संशयित व्यक्ती काळ्या रंगाच्या महिंद्रा थार गाडीतून फिरत असून, ते पान टपरीवर ५०० रुपयांच्या बनावट नोटा देऊन सिगारेट खरेदी करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून निखिल शिवाजी गांगर्डे (वय २७, रा. कुंभळी, ता. कर्जत) आणि सोमनाथ माणिक शिंदे (वय २५, रा. तपोवन रोड) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या गाडीची झडती घेतली असता, ८०,००० रुपयांच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांना मिळाल्या.

ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीतून पोलिसांनी या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेतला. यात बीड जिल्ह्यातील प्रदीप संजय कापरे (वय २८, रा. तिंतरवणी, ता. शिरुर कासार) तसेच छत्रपती संभाजीनगर येथील मंगेश पंढरी शिरसाठ (वय ४०), विनोद दामोधर अरबट (वय ५३), आकाश प्रकाश बनसोडे (वय २७), आणि अनिल सुधाकर पवार (वय ३४) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अंबादास रामभाऊ ससाणे (रा. शहर टाकळी, ता. शेवगाव) हा आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या कारवाईत पोलिसांनी ५९ लाख ५० हजार रुपयांच्या तयार बनावट नोटा, बनावट नोटा तयार करण्याचे कागद व शाई, तसेच २७ लाख ९० हजार ६०० रुपयांची मशिनरी व इतर साहित्य असा एकूण ८८ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पान टपरी चालकाच्या सतर्कतेमुळेच हे मोठे रॅकेट उघडकीस आले. त्याने दाखवलेल्या सजगतेमुळे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत त्याचे कौतुक केले आणि त्याचा सत्कार करणार असल्याचे सांगितले. या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्यासह भरत धुमाळ, सुभाष थोरात, रविकिरण सोनटक्के, बाबासाहेब खेडकर, मंगेश खरमाळे, शरद वांदेकर, खंडू शिंदे, सागर मिसाळ, राजू खेडकर, विक्रांत भालसिंग, आदिनाथ शिरसाठ, अन्सार शेख, मोहिनी कर्डक आणि नितीन शिंदे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,336
अहिल्यानगर पोलीस बनावट नोटा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्याचा विकास हा कष्टातून उभा राहिला असून केवळ मोबाईलवर अफवा…

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.