Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर येथे ‘सत्यशोधक विचारमंच’तर्फे हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

June 16, 2026

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

June 16, 2026

आज मंगळवार, १६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुर्दैवी घटना: पतीच्या अपघाती निधनामुळे नैराश्यातून पत्नीची मुलीसह आत्महत्या
श्रद्धांजली

दुर्दैवी घटना: पतीच्या अपघाती निधनामुळे नैराश्यातून पत्नीची मुलीसह आत्महत्या

सुरेखा यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. तेंव्हा मोबाईलचे शेवटचे लोकेशन तलावाजवळ असल्याचे दिसून आले.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 4, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

पारनेर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीच्या अपघाती निधनामुळे नैराश्य आलेल्या एका महिलेने आपल्या एकुलत्या एक मुलीसह शेताजवळील तलावात उडी मारून आत्महत्या केली.

ही घटना १ ऑगस्ट रोजी पहाटे १:३० च्या सुमारास पारनेर तालुक्यातील कन्हेर ओहळ परिसरात उघडकीस आली. सुरेखा दत्तात्रेय औटी (वय ४२) आणि शिवांजली दत्तात्रेय औटी (वय २१) अशी आत्महत्या केलेल्या माय-लेकींची नावे आहेत.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी, पारनेर रस्त्यावर झालेल्या एका अपघातात सुरेखा यांचे पती दत्तात्रेय औटी यांचे निधन झाले होते. पतीच्या अकाली निधनामुळे सुरेखा नैराश्यात होत्या.

पारनेर शहरात राहणाऱ्या सुरेखा आणि त्यांची मुलगी शिवांजली, नेहमीप्रमाणे ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. त्यांनी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत काम केले. मात्र, काम संपवून घरी परतण्याऐवजी त्यांनी शेताजवळील तलावात उडी घेऊन जीवन संपवले.

सायंकाळी ७ वाजून गेल्यावरही आई आणि बहीण घरी न परतल्याने, सुरेखा यांचा मुलगा तेजसने जवळच राहणाऱ्या चुलत्यांशी संपर्क साधला. त्यानंतर, नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी दोघींचा शोध सुरू केला. रात्री ११ वाजेपर्यंत शोध लागला नाही, म्हणून त्यांनी पारनेर पोलीस ठाण्यात त्या दोघी हरवल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सुरेखा यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. तेंव्हा मोबाईलचे शेवटचे लोकेशन तलावाजवळ असल्याचे दिसून आले. या माहितीवरून पोलीस आणि नातेवाईकांनी तलावाच्या परिसरात शोध घेतला. रात्री दीड वाजता तलावाच्या काठावर सुरेखा यांची पिशवी आणि त्यातील मोबाईल पोलिसांना सापडला. जवळच तलावाच्या डोहात सुरेखा आणि शिवांजली यांचे मृतदेह तरंगताना दिसले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी टाकळी ढोकेश्वर येथील रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,266
आत्महत्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

प्रियकराने दिला दगा, नैराश्यातून आयटी इंजिनिअर तरुणीची आत्महत्त्या!

May 28, 2026

खाणीतील पाण्यात बुडून दोन सख्या भावांचा अंत; संगमनेर तालुक्यातील तिगाववर शोककळा

May 23, 2026

उरण तालुका रिक्षा युनियनचे अध्यक्ष ज्येष्ठ समाज कार्यकर्ते प्रफुल्ल पुरो (अण्णा) यांचे देहावसान

April 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर येथे ‘सत्यशोधक विचारमंच’तर्फे हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

By अनंत पांगारकरJune 16, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर:  येथील सत्यशोधक विचारमंचच्या वतीने सुरू असलेल्या व्याख्यानमालेत शनिवारी (२० जून)…

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

June 16, 2026

आज मंगळवार, १६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 16, 2026

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल

June 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.