Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची न्यायाधीशपदी नियुक्ती लोकशाहीवरील आघात, आमदार रोहित पवार
राजकारण

राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची न्यायाधीशपदी नियुक्ती लोकशाहीवरील आघात, आमदार रोहित पवार

नियुक्ती केवळ एका व्यक्तीची नसून, ती संविधानाने दिलेल्या 'सेपरेशन ऑफ पॉवर्स'च्या तत्त्वाची कसोटी पाहणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/08/2025Updated:05/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

मुंबई: सत्ताधारी पक्षाचे प्रवक्तेपद भूषवलेल्या व्यक्तीची थेट न्यायाधीशपदी नेमणूक करण्याच्या संभाव्य निर्णयामुळे राजकीय आणि न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेत ही नियुक्ती म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वांत मोठा आघात असल्याचे म्हटले आहे.

आमदार पवार यांनी या प्रकरणी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना या पदावर नेमणे म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का? संविधानाने सत्तेचं केंद्रीकरण टाळण्यासाठी आणि ‘चेक्स अँड बॅलन्सेस’ (नियंत्रण आणि संतुलन) राखण्यासाठी ‘सेपरेशन ऑफ पॉवर’ (अधिकारांचे विभाजन) हे तत्त्व स्वीकारले आहे. राजकीय प्रवक्त्याची न्यायाधीशपदी नियुक्ती हे या तत्त्वाचे आणि पर्यायाने संविधानाचे उल्लंघन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

https://x.com/RRPSpeaks/status/1952674461473223098?t=8M7HtfWE8mB-jDsd-pNilA&s=19

पवार यांनी या नियुक्तीच्या दूरगामी परिणामांवर चिंता व्यक्त केली. ज्यावेळी उच्च न्यायालयातील न्यायाधीश राजकीय पार्श्वभूमी आणि सत्ताधारी पक्षातील पदाचा उपभोग घेतलेली असेल, त्यावेळी न्यायदानाच्या प्रक्रियेत राजकीय अभिनिवेश बाळगला जाणार नाही, याची खात्री कोण देणार? असा सवाल त्यांनी विचारला. एका राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीने संपूर्ण न्यायदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

पवार यांनी संबंधित व्यक्तीच्या पात्रतेवर कोणताही आक्षेप घेतला नाही. मात्र, न्यायदान हे सामान्य नागरिकांसाठी कोणत्याही अभिनिवेशाशिवाय असते, या सामान्य माणसाच्या भावनेला या निर्णयामुळे धक्का पोहोचत असल्याचे म्हणाले. त्यामुळे, संबंधित राजकीय व्यक्तीची न्यायाधीश पदावरील नियुक्तीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, या गंभीर प्रकरणी आदरणीय सरन्यायाधीश साहेबांनी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

ही नियुक्ती केवळ एका व्यक्तीची नसून, ती संविधानाने दिलेल्या ‘सेपरेशन ऑफ पॉवर्स’च्या तत्त्वाची कसोटी पाहणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 786
ट्विटर न्यायाधीश रोहित पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.