Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांची बदली, रिक्त जागेवर नियंत्रण कक्षातून हे निरीक्षक घेणार पदभार; एसपींनी जिल्ह्यात सहा निरीक्षकांसह पोलिसांच्या केल्या बदल्या
प्रशासन

अखेर पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांची बदली, रिक्त जागेवर नियंत्रण कक्षातून हे निरीक्षक घेणार पदभार; एसपींनी जिल्ह्यात सहा निरीक्षकांसह पोलिसांच्या केल्या बदल्या

काही दिवसांपूर्वीच तडकफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेले एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे आता नियंत्रण कक्षाचे प्रभारी असतील.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

अहिल्यानगर: जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी जिल्हा पोलीस दलातील सहा पोलीस निरीक्षकांच्या व जवळपास ११४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांवरील बदलीचे संकट टळले असले तरी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. 

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांची शिर्डीच्या साई मंदिरात मंदिर सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या रिक्त जागेवर नियंत्रण कक्षातून पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांची वर्णी लागली आहे. साळुंखे संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे आता नवे पोलीस निरीक्षक असतील. 

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस दलात फेरबदल करताना नियंत्रण कक्षातील दोघा पोलीस निरीक्षकांना नव्या नियुक्त्या दिल्या आहे. गेल्या काही दिवसापासून बदलीची चर्चा असलेले संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची मात्र बदली झालेली नाही. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे संगमनेर मधील काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा सुरू होती. 

नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची बदली जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची बदली जाधव यांच्या रिक्त जागेवर नेवासा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांची बदली दहशतवाद विरोधी पथकात करण्यात आली आहे तर दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांची नियुक्ती नियंत्रण कक्षात करण्यात आली. 

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे साई मंदिराची सुरक्षा बघतील तर त्यांच्या जागेवर नियंत्रण कक्षातून प्रवीण साळुंखे यांना पाठविण्यात आले आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच तडकफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेले एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे आता नियंत्रण कक्षाचे प्रभारी असतील. या शाखेचा तात्पुरता पदभार पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,726
पोलीस निरीक्षक बदल्या बदल्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.