Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्वच्छतेतून समृद्धीकडे संगमनेरची वाटचाल! दिवाळीपूर्वी संगमनेर पॅटर्नची नवी छटा, आज निघणार ‘एक पणती स्वच्छतेची’ भव्य रॅली; यांची राहणार उपस्थिती

04/11/2026

जिल्ह्यातील राजकीय ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेरच्या विकासाच्या रुळावर धावणार? अमोल शेलकरांचे नेत्यांना आवाहन

04/11/2026

बुधवार दि. ०४ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

04/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आदिवासी दिनानिमित्त ड्राय डे: सुमारे साडेतीन लाखाची दारू वाहतूक करताना संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हेगारी

आदिवासी दिनानिमित्त ड्राय डे: सुमारे साडेतीन लाखाची दारू वाहतूक करताना संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई

पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे करत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर, प्रतिनिधी: ड्राय डे च्या दिवशी दारू विकण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती दारूची वाहतूक करत असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 3 लाख 35 हजार 360 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शाहूनगर (अकोले) येथील राजेश बबन शिंदे याला दारूची वाहतूक करताना पकडण्यात आले. संगमनेर पोलिसांची अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर ही मोठी कारवाई मानली जात आहे.

शनिवारी (9 ऑगस्ट) अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने प्रशासनाने अकोलेमध्ये ‘ड्राय डे’चे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर राजेश बबन शिंदे (वय 40 वर्ष, रा. शाहूनगर, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) हा संगमनेर मधून अकोल्याकडे दारू वाहतूक करणार असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या आदेशावरून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, हरिश्चंद्र पांडे आत्माराम पवार यांच्या पथकाने संगमनेर खुर्द येथे आरोपीला पकडण्यासाठी शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता सापळा लावला होता. 

पोलिसांनी एका संशयित वाहनाला थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान, मारुती कंपनीच्या सिल्व्हर रंगाच्या व्हॅनमधून (क्रमांक एमएच 14 एक्स 6510) 3 लाख 35 हजार 360 रुपये किमतीचा देशी दारूचा साठा मिळून आला. पोलिसांनी तातडीने दारूसाठा आणि वाहन जप्त केले. याप्रकरणी, अवैध दारूची वाहतूक करणारा आरोपी विशाल बबन शिंदे याला ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भात संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 738 दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65 (अ)(ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,383
अवैध दारू वाहतूक क्राईम गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

02/11/2026

दोडक्याच्या पिकात गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची धडक कारवाई

01/11/2026

शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञावर गुन्हा दाखल

30/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

स्वच्छतेतून समृद्धीकडे संगमनेरची वाटचाल! दिवाळीपूर्वी संगमनेर पॅटर्नची नवी छटा, आज निघणार ‘एक पणती स्वच्छतेची’ भव्य रॅली; यांची राहणार उपस्थिती

By Annant Ppangarkar04/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराला स्वच्छतेतून समृद्धीकडे नेण्यासाठी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ४ वाजता…

जिल्ह्यातील राजकीय ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेरच्या विकासाच्या रुळावर धावणार? अमोल शेलकरांचे नेत्यांना आवाहन

04/11/2026

बुधवार दि. ०४ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

04/11/2026

संगमनेरमध्ये उद्या ‘एक पणती स्वच्छतेची’ जनजागृती रॅली; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

03/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.