Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोनशे रुपयांच्या वादातून तरुणाचा खून, चार जणांवर गुन्हा दाखल एक ताब्यात; संगमनेरच्या या गावातील घटना
गुन्हेगारी

दोनशे रुपयांच्या वादातून तरुणाचा खून, चार जणांवर गुन्हा दाखल एक ताब्यात; संगमनेरच्या या गावातील घटना

आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५१/२०२५ नुसार बीएनएस २०२३ चे कलम १०३(१) ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर – आश्वी, प्रतिनिधी

अवघ्या दोनशे रुपयांच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे घडली आहे. मतीन मेहबूब शेख (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आश्वी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, इतर तिघांचा शोध सुरू आहे.

ही घटना शुक्रवारी, (८ ऑगस्ट) रात्री ८:४५ वाजताच्या सुमारास घडली. मतीन शेख याने आसीफ शेख याला उसने दिलेले दोनशे रुपये त्यांच्या वडीलाकडे मागीतल्याचा राग आल्याने याच रागातून आरोपी आसिफ शेख, सोहेल आंधळे, पप्पू भांड, आणि गौतम गायकवाड यांनी मतीनला प्रतापपूर शिवारातील शासकीय विश्रामगृहाजवळ गाठले.

यावेळी आरोपींची मतीनसोबत बाचाबाची केली. त्यानंतर सोहेल आंधळे, पप्पू भांड आणि गौतम गायकवाड यांनी मतीनचे हात-पाय पकडले. याच संधीचा फायदा घेत, आसिफ शेख याने मतीनच्या पाठीत खिळा खुपसून त्याला गंभीर जखमी केले.

घटनेनंतर मतीनला तातडीने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मतीनचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली होती.

या प्रकरणी, मतीनच्या आईने बिलकीस उर्फ शाकीरा महेमुद शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५१/२०२५ नुसार बीएनएस २०२३ चे कलम १०३(१) ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर, एका आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असल्याची माहिती माहिती मिळाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,811
क्राईम खून गुन्हेगारी हत्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.