Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडे कालव्याचं पाणी पोरा-बाळांनीच आणून दाखवलं: माजी खासदार विखे
पाण्याचे राजकारण

निळवंडे कालव्याचं पाणी पोरा-बाळांनीच आणून दाखवलं: माजी खासदार विखे

पाणी आणणं हे केवळ राजकारण नाही, तर जनतेच्या जगण्याशी जोडलेली जबाबदारी आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 11, 2025Updated:August 11, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: जे काम पन्नास वर्षांत सर्व सत्तास्थानांवर असूनही तुम्हाला जमलं नाही, ते पोरं-बाळांनीच करून दाखवलं आणि पाणी आणल्याचं सिद्ध केलं, असा टोला लगावत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर नाव न घेता जोरदार टीका केली.

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या निळवंडे डाव्या कालव्याचं पाणी अखेर संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी येथे पोहोचलं आणि त्याचा जलपूजन सोहळा नुकताच पार पडला. या ऐतिहासिक क्षणी डॉ. विखे बोलत होते. 

डॉ. विखे म्हणाले की, निळवंडे डावा कालवा योजना गेल्या ३०-४० वर्षांपासून केवळ कागदावर होती. या काळात अनेक बैठका झाल्या, आश्वासनं दिली गेली, पण पाण्याचा एक थेंबही गोरक्षवाडी किंवा संगमनेरमध्ये पोहोचला नाही. जनतेच्या अपेक्षा वाढवल्या गेल्या, पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. आज हा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याची समस्याही मिटणार आहे. हा टप्पा शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणणारा असल्याचं त्यांनी नमूद केलं.

विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करताना ते म्हणाले, गेली २५ वर्षे मंत्री राहूनही पाणी देता आलं नाही आणि आजही मतदारसंघात २०० टँकर धावत आहेत. पण संगमनेरच्या जनतेनेच तो बदल घडवला आणि आमदार म्हणून अमोल खताळ यांना निवडून दिलं. घोषणांनी पोट भरत नाही, प्रत्यक्ष काम केल्याशिवाय जनता समाधानी होत नाही आणि आता तालुक्यात खऱ्या कामाला सुरुवात झाली आहे.

यापूर्वी भोजापूर धरणाचं पाणी नान्नज दुमाला, तीगाव, सोनोशीपर्यंत पोहोचवल्याचं उदाहरण देत ते म्हणाले, गेली ३० वर्षे हा चमत्कार कुणीच घडवू शकला नव्हता, पण शिस्त, नियोजन आणि काटेकोर लक्ष ठेवल्यास अशा योजना पूर्ण होऊ शकतात. पाणी आणणं हे केवळ राजकारण नाही, तर जनतेच्या जगण्याशी जोडलेली जबाबदारी आहे.

या कामात केंद्र सरकारचं मोठं योगदान आहे. हे पाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, केंद्र सरकारच्या निधीतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मिळालं आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पाणी सोडण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम झाल्यामुळे, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम असून पुढील दोन वर्षांत निमगावजाळीचा प्रत्येक कोपरा पाण्याखाली आणू असं ते म्हणाले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 563
पाणी पाणी पूजन सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या बेकायदा घरावर बुलडोझर; अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलीच धडक कारवाई

June 18, 2026

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026

निळवंडे धरणातून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडा; निळवंडे पाटपाणी कृती समितीची कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी

April 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 17, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आशादायी आणि प्रगतीकारक ठरेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली…

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.