Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या तरुणांसाठी सुवर्णसंधी: ‘आय लव्ह संगमनेर’तर्फे पोलिस व आर्मी भरतीसाठी विशेष मार्गदर्शन! आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा परीक्षांचे भव्य आयोजन
सामाजिक

संगमनेरच्या तरुणांसाठी सुवर्णसंधी: ‘आय लव्ह संगमनेर’तर्फे पोलिस व आर्मी भरतीसाठी विशेष मार्गदर्शन! आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा परीक्षांचे भव्य आयोजन

अधिक माहिती लवकरच 'आय लव्ह संगमनेर'च्या www.ilovesangamner.org या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त (२७ सप्टेंबर) ‘आय लव्ह संगमनेर’ संस्थेने पोलीस भरती, आर्मी भरतीसह इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष अभियानाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात तरुणांना मार्गदर्शन, सराव परीक्षा आणि शारीरिक चाचण्यांची तयारी करून घेतली जाईल. या माध्यमातून संगमनेर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

आमदार सत्यजीत तांबे हे तरुणांना प्रोत्साहन देणारे आणि त्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या याच कार्याचा एक भाग म्हणून ‘आय लव्ह संगमनेर’ या संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. यासंदर्भात माहिती देताना स्पर्धा परीक्षा प्रकल्प प्रमुख प्रवीण शिंदे म्हणाले, या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. येत्या दोन-तीन दिवसात या प्रक्रियेला सुरुवात होईल.

या विशेष अभियानात मिनी पोलीस भरती, आर्मी भरती, पॅरा मिलिटरी भरती यांच्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. तसेच, विविध स्पर्धा परीक्षांसाठी विशेष सराव परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे ग्राउंड वरील सर्व परीक्षा चीपद्वारे रेकॉर्ड केल्या जाणार आहे.

यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे, मैदानावर होणाऱ्या सर्व शारीरिक चाचण्या अत्याधुनिक चीपद्वारे (Chip) रेकॉर्ड केल्या जाणार आहेत, ज्यामुळे निकालात पूर्णपणे पारदर्शकता येईल. बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय केली जाणार आहे.

या स्पर्धा परीक्षांसंदर्भात अधिक माहिती लवकरच ‘आय लव्ह संगमनेर’च्या www.ilovesangamner.org या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 606
आय लव्ह संगमनेर सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे! आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट इशारा, अन्यथा आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणार

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.