Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सर्रास गोहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी: ह्यूमन रिलीफ अल्पसंख्यांक फाउंडेशनचे निवेदन
गुन्हेगारी

सर्रास गोहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी: ह्यूमन रिलीफ अल्पसंख्यांक फाउंडेशनचे निवेदन

कायद्याचे पालन करणारे जागरूक मुस्लिम समाज या प्रकरणात पोलिसांना पूर्ण सहकार्य देण्यास तयार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील कुरण गावात सर्रास सुरू असलेल्या गोहत्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी ह्यूमन रिलीफ अल्पसंख्यांक फाउंडेशनने एका निवेदनाद्वारे केली आहे. यासंबंधीचे निवेदन आज, (१४ ऑगस्ट) फाउंडेशनच्या वतीने संगमनेर शहर पोलिस निरीक्षकांना देण्यात आले.

या निवेदनात, संगमनेरमधील समस्त मुस्लिम समाजाने कुरण गावात काही व्यक्तींकडून सातत्याने होत असलेल्या गोहत्यांबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्रभर कुरेशी, खाटीक व्यापारी आणि शेतकरी संघटनांनी जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार घालून व्यापार व कत्तलखाने बंद ठेवले असतानाही कुरण गावात मात्र कसलीही भीती न बाळगता गोहत्या सुरू असल्याचं निदर्शनास आले आहे. पोलिसांनी अनेकदा छापे टाकले असले तरीही हा प्रकार थांबत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या कृत्यांमुळे हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून, समाजात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी चिंता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. गोहत्या करणारे हे समाजकंटक असून त्यांच्यावर कठोर शासन करण्याची मागणी फाउंडेशनने केली आहे. निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, कुरणमध्ये दररोज दोन ते तीन जनावरे कापली जातात आणि त्यांची वाहतूक केवळ संगमनेरच नव्हे, तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बंगळूरू अशा दूरच्या ठिकाणीही केली जाते.

या संवेदनशील विषयाची तात्काळ दखल घेऊन गोहत्या करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी आणि कायद्याचे पालन करणारा जागरूक मुस्लिम समाज या प्रकरणात पोलिसांना पूर्ण सहकार्य देण्यास तयार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हे निवेदन संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह, अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधिकारी आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही देण्यात आले आहे.

निवेदन सादर करताना संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख यांच्यासह शहबाज शेख, साजिद शेख, रईस शेख, गुफरान बेग, इम्रानखान पठाण, रमिज शेख, नदीम कुरेशी, सलीम शेख, जमीर बेग, विकार शेख, अब्दुलमाजिद शेख, आसिफ शेख, हाजी सरवर कुरेशी, गुड्डू इंजिनिअर, रईस शेख, शौकत पठाण आदी समाजबांधव उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 951
गो हत्या ह्यूमन रिलीफ अल्पसंख्यांक फाउंडेशन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.