Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026

आज शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

21/08/2026

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

20/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर, बघा प्रभाग निहाय संगमनेर शहराची रचना!
निवडणूक

नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर, बघा प्रभाग निहाय संगमनेर शहराची रचना!

प्रभागांची प्रारूप रचना जाहीर झाल्याने आता इच्छुकांमधून मोर्चे बांधलेला वेग येण्यास सुरुवात झाली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/08/2025No Comments13 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: न्यायालयाच्या निर्देशानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीचे प्रक्रिया सुरू होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार असून त्यासाठीच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा सोमवारी जाहीर करण्यात आला.
जिल्ह्यात सर्वाधिक प्रभाग श्रीरामपूर आणि त्या पाठोपाठ संगमनेर, कोपरगाव नगर परिषदेमध्ये राहणार आहे. श्रीरामपूरमध्ये 17 प्रभागांमधून 34 सदस्य, संगमनेर व कोपरगावमधून 15 प्रभागातून प्रत्येकी 30 सदस्य असतील.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि त्यांच्या सीमांचे प्रारूप खालील प्रमाणे
प्रभाग क्रमांक १
* श्रमिक नगर, गोविंद नगर आणि गणेश नगर या भागांचा समावेश आहे.
* एकूण लोकसंख्या ४१३६ असून, त्यापैकी अनुसुचित जातीची लोकसंख्या २९८ आणि अनुसुचित जमातीची लोकसंख्या ८६ आहे.
* या प्रभागातून दोन सदस्य निवडले जातील.
* प्रभागाच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
* उत्तर: पुणे-नाशिक महामार्ग आणि अकोले बायपास संगम, तसेच नगरपरिषद हद्दीतील (सर्वे क्रमांक १२५) भाग.
* पूर्व: पुणे-नाशिक महामार्ग आणि अकोले बायपास संगमपासून निलेश मोटर्स, गणेश नगर कॉर्नरपर्यंत.
* दक्षिण: निलेश मोटर्स, गणेश नगर कॉर्नरपासून श्रीराम सुपर शॉपी, आंबरे पाटील कन्या विद्यालय कॉर्नर, पद्म रसिक शहा विद्या मंदिर गेट, खांबेकर यांची वृंदावन इमारत, सुभाष देशमुख यांचे स्वप्नसंच घर, तुषार प्राईड कॉर्नर ते अकोले बायपासवरील स्वयंवर मंगल कार्यालय कॉर्नरपर्यंत.
* पश्चिम: अकोले बायपासवरील स्वयंवर मंगल कार्यालय कॉर्नरपासून पुणे-नाशिक महामार्ग आणि अकोले बायपास संगमपर्यंत.

प्रभाग क्रमांक २
* ऑरेंज कॉर्नर, सुयोग सोसायटी, भरत नगर, स्वामी समर्थ नगर आणि सिद्धिविनायक सोसायटी या प्रभागात येतात.
* एकूण लोकसंख्या ४०२७ आहे, ज्यामध्ये अनुसुचित जातीची लोकसंख्या ३९३ आणि अनुसुचित जमातीची लोकसंख्या १४८ आहे.
* प्रभाग क्रमांक २ मधून दोन सदस्य निवडले जातील.
* प्रभागाच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
* उत्तर: १३२ के.व्ही. नैऋत्य कॉर्नर, नाशिक पुणे हायवे ते साई श्रद्धा चौक ते तिरंगा चौक पर्यंत.
* पूर्व आणि दक्षिण: तिरंगा चौक पासून मालदाड रोडने त्रिमूर्ती चौक, जैन क्लासेस आणि खुल्या प्लॉट शेजारून दक्षिणेकडे एम.एस.ई.बी. सबडिव्हिजन समोरून पद्म नगरमधील श्रीगादी यांच्या घरापर्यंत.
* पश्चिम: पंचवटी हॉटेल नैऋत्य कॉर्नर, पुणे नाशिक हायवे.

प्रभाग क्रमांक ३
* मालदाड रोड, आदर्श कॉलनी, आनंद नगर आणि सौभाग्य मंगल कार्यालय यांचा या प्रभागात समावेश आहे.
* या प्रभागाची एकूण लोकसंख्या ४४३८ आहे, ज्यात अनुसुचित जातीचे ३६२ आणि अनुसुचित जमातीचे ४७ लोक आहेत.
* या प्रभागातून दोन सदस्य निवडले जातील.
* प्रभागाच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
* उत्तर: कोंडाजी सातपुते रोड ते शशिकांत अभंग यांचे घर, साईनाथ कृषी भांडारच्या आग्नेय कॉर्नरपर्यंत, सर्वे नंबर १३१ (उत्तर बाजू) ते आग्नेय दिशेने बारेकर यांचे शेड ते मारुती मंदिर, पावबाकी रोड पर्यंत. मारुती मंदिर पासून अश्वमेघ फॅब्रिकेशन दुकानापर्यंत. अश्वमेघ फॅब्रिकेशन दुकान, पावबाकी रोड ते किसान कृषी सेवा केंद्र ते वैदुवाडी येथील श्री लक्ष्मी माई मंदिरापर्यंत.
* पूर्व: पद्म नगरमधील श्रीगादी यांच्या घरापासून ते टॉप टेन इम्पेरियल इमारतीचा ईशान्य कॉर्नर ते पंचवटी हॉटेल विहीर ते पंचवटी हॉटेल नैऋत्य कॉर्नर, पुणे नाशिक हायवेपर्यंत.
* दक्षिण: वैदुवाडी येथील श्री लक्ष्मी माई मंदिर ते पद्म नगरमधील श्रीगादी यांचे घर ते एम.एस.ई.बी. सब डिव्हिजनसमोर जैन क्लासेस ते त्रिमूर्ती चौक, मालदाड रोड ते कोंडाजी सातपुते यांचे घर, मालदाड रोड पर्यंत.
* पश्चिम: पंचवटी हॉटेल नैऋत्य कॉर्नर, पुणे नाशिक हायवे ते १३२ के.व्ही. नैऋत्य नगरपरिषद हद्दीपर्यंत.

प्रभाग क्रमांक ४
* कुरण रोड, गुंजाळ आखाडा, पानसरे आखाडा, पंचायत समिती, पाबळे वस्ती आणि जब्बार मळा या प्रभागात येतात.
* एकूण लोकसंख्या ४२९९ असून, त्यापैकी अनुसुचित जातीची लोकसंख्या १०८८ आणि अनुसुचित जमातीची लोकसंख्या ९ आहे.
* या प्रभागातून दोन सदस्य निवडले जातील.
* प्रभागाच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
* उत्तर: पावबाकी रोड, सात बंगला वायव्य कॉर्नर संरक्षक भिंतीपासून सुकेवाडी रोड नगरपरिषद हद्द ते मीरा हॉटेल ते कुरण रोड (सर्वे नं. १५५ न.प. हद्द) ते बिलाल नगर ते कोल्हार-घोटी महामार्ग नगरपालिका हद्दीपर्यंत (सर्वे नं. १७४ पूर्व बाजू).
* पूर्व: नगर परिषद हद्द (सर्वे नं. १७४ पूर्व बाजू), कोल्हार-घोटी महामार्ग ते सर्वे नं. १७५, १७६, आणि १८१ पूर्व बाजू ते नगरपरिषद हद्दीने कोल्हेवाडी रोड ते मोहमद युसुप स. यांचा गाळा ते अरिफ अहमद शेख यांचे घर (सर्वे नं. १८७) ते सर्वे नं. १८८ जुना जोर्वे रोड न.प. हद्दीपर्यंत.
* दक्षिण: जुना जोर्वे रोड नगरपरिषद हद्द (सर्वे नं. १८८) ते पाबळे वस्तीकडे जाणारा कॉर्नर ते पाबळे वस्ती रोड व कोल्हेवाडी रोड संगम ते गोल्डन ऑटो पार्ट्स शॉप ते नाटकीनाला ते मास्टर ऑटो इलेक्ट्रिक ते प्रवरा ऑटोमोबाईल्स, कोल्हार-घोटी महामार्ग ते अलका फुट कॉर्नर, कोल्हार-घोटी महामार्ग पर्यंत.
* पश्चिम: अलका फुट, कोल्हार-घोटी महामार्गापासून भूमी अभिलेख कार्यालय नैऋत्य कॉर्नर ते पावबाकी रोड सात बंगला वायव्य कॉर्नर संरक्षक भिंत न.प. हद्दी पर्यंत.

प्रभाग क्रमांक ५
* शिवाजी नगर, पद्मनगर, स्वप्ननगरी, क्रांती चौक आणि आशिर्वाद पतसंस्था या भागांचा समावेश आहे.
* एकूण लोकसंख्या ४१५९ असून, त्यापैकी अनुसुचित जातीची लोकसंख्या २४७ आणि अनुसुचित जमातीची लोकसंख्या ३९ आहे.
* या प्रभागातून दोन सदस्य निवडले जातील.
* प्रभागाच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
* उत्तर: पंचवटी हॉटेल नैऋत्य कॉर्नर, नाशिक पुणे हायवेपासून पंचवटी हॉटेलची विहीर ते टॉप टेन इम्पेरियल ईशान्य कॉर्नर ते पद्म नगरमधील श्री गादी यांचे घर ते वैदुवाडी श्री लक्ष्मी माई मंदिर ते किसान कृषी सेवा केंद्र ते अश्वमेघ फॅब्रिकेशन दुकान, पावबाकी रोड पर्यंत.
* पूर्व: अश्वमेघ फॅब्रिकेशन दुकान, पावबाकी रोड ते गुलाब गार्डनचा आग्नेय कॉर्नर पर्यंत.
* दक्षिण: गुलाब गार्डन आग्नेय कॉर्नर ते जानकी नगर मार्ग ते श्री ओहोळ यांचे घर ते आनंद ऋषी पतसंस्था ते काश्मीर हॉटेल नाशिक पुणे हायवे पर्यंत.
* पश्चिम: काश्मीर हॉटेल नाशिक पुणे हायवे ते हॉटेल सरस्वती ते हॉटेल पंचवटी नैऋत्य कॉर्नर, नाशिक पुणे हायवे पर्यंत.

प्रभाग क्रमांक ६
* जनतानगर, चैतन्यनगर या प्रभागात येतात.
* एकूण लोकसंख्या ४१६९ असून, त्यापैकी अनुसुचित जातीची लोकसंख्या १८६ आणि अनुसुचित जमातीची लोकसंख्या ९६ आहे.
* या प्रभागातून दोन सदस्य निवडले जातील.
* प्रभागाच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
* पूर्व: निलेश मोटर्स नाशिक पुणे हायवे ते हॉटेल सरस्वती (जय जवान चौक) नाशिक पुणे हायवे पर्यंत.
* दक्षिण: हॉटेल सरस्वती (जय जवान चौक) नाशिक पुणे हायवे ते कानवडे यांची इमारत ते दातीर सर यांचे घर ते ताम्हाणे हॉस्पिटल ते राजयोग स्वीट्स, अकोले बायपास पर्यंत.
* पश्चिम: राजयोग स्वीट्स, अकोले बायपास रोड पासून हॉटेल सुप्रीम बार कॉर्नर ते स्वयंवर मंगल कार्यालय, अकोले बायपास पर्यंत.

प्रभाग क्रमांक ७
* इंदिरानगर, सह्याद्री विद्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय विश्राम गृह यांचा या प्रभागात समावेश आहे.
* एकूण लोकसंख्या ४१२४ असून, अनुसुचित जातीची लोकसंख्या ३८१ आणि अनुसुचित जमातीची लोकसंख्या १५८ आहे.
* या प्रभागातून दोन सदस्य निवडले जातील.
* प्रभागाच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
* उत्तर: राजयोग स्वीट्स, अकोले बायपास ते ताम्हाणे हॉस्पिटल ते दातीर सर यांचे घर ते कानवडे यांची इमारत ते सरस्वती हॉटेल, (जय जवान चौक) नाशिक पुणे हायवे पर्यंत.
* पूर्व: सरस्वती हॉटेल, जय जवान चौक, नाशिक पुणे हायवे ते पीडब्ल्यूडी गेस्ट हाउस आग्नेय कॉर्नर, नाशिक पुणे हायवे पर्यंत.
* दक्षिण: पीडब्ल्यूडी गेस्ट हाउस आग्नेय कॉर्नर, नाशिक पुणे हायवे पासून अकोले बायपास रोडने पेटीट कॉलेज सर्कल पर्यंत.
* पश्चिम: पेटीट कॉलेज सर्कल, अकोले बायपास ते राजयोग स्वीट्स, अकोले बायपास पर्यंत.

प्रभाग क्रमांक ८
* देवाचा मळा, सावता माळी नगर, एस.टी. स्टँड, पंजाबी कॉलनी, वकील कॉलनी, अभंग मळा, शारदा विद्यालय या प्रभागात येतात.
* एकूण लोकसंख्या ४७२० असून, अनुसुचित जातीची लोकसंख्या ३१२ आणि अनुसुचित जमातीची २५३ आहे.
* या प्रभागातून दोन सदस्य निवडले जातील.
* प्रभागाच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
* उत्तर: मेडिकव्हर हॉस्पिटल समोर (सर्वे नं. ७५) नगरपरिषद हद्दीपासून ते अकोले बायपास ते पेटीट कॉलेज सर्कल ते संगमनेर बस स्टँड ईशान्य कॉर्नर, नाशिक पुणे हायवे पर्यंत.
* पूर्व: संगमनेर बस स्टँड ईशान्य कॉर्नर, नाशिक पुणे हायवे ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मोमीनपुरा चौक पर्यंत.
* दक्षिण: मोमीनपुरा चौक पासून पीरजादे यांची दर्गा कॉर्नर ते मुटकुळे हॉस्पिटल समोर ते बाप्ते झेरॉक्स सर्कल ते तहसील कार्यालयाचा आग्नेय कॉर्नर ते नेहरू गार्डन मुख्य प्रवेश द्वार ते महात्मा फुले पुतळा, मेन रोड ते अकोले नाका ते म्हाळुंगी नदी पूर्व बाजू ते म्हाळुंगी नदी व म्हानुटी नाला यांचा संगम ते राजापूर रोड पगूबाई गोडाऊन कॉर्नर पर्यंत.
* पश्चिम: राजापूर रोड पगूबाई गोडाऊन कॉर्नर पासून नगरपरिषद् हद्द ते मेडिकव्हर हॉस्पिटल समोर (सर्वे नं. ७५) नगरपरिषद हद्दीपर्यंत.

प्रभाग क्रमांक ९
* नविन नगर रोड, लिंक रोड, ताजणे मळा, नवघर गल्ली, अरगडे गल्ली यांचा या प्रभागात समावेश आहे.
* एकूण लोकसंख्या ४४३३ असून, अनुसुचित जातीची लोकसंख्या १७२ आणि अनुसुचित जमातीची लोकसंख्या १२६ आहे.
* या प्रभागातून दोन सदस्य निवडले जातील.
* प्रभागाच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
* उत्तर: संगमनेर बस स्थानक ईशान्य कॉर्नर, नाशिक पुणे हायवे ते आनंद ऋषी पतसंस्था ते श्री. दवंगे यांचे घर ते श्री जोशी यांचे घर ते जानकीनगर रोड ते गुलाब गार्डन आग्नेय कॉर्नर, पावबाकी रोड पर्यंत.
* पूर्व: गुलाब गार्डन आग्नेय कॉर्नर पावबाकी रोड ते भूमी अभिलेख ते अलका फुट, कोल्हार घोटी हायवे पर्यंत.
* दक्षिण: अलका फुट, कोल्हार-घोटी महामार्ग ते मे. शिवदास राम रतन अॅण्ड कंपनी पेट्रोल पंप ते तीनबत्ती चौक ते नाशिक पुणे हायवेने जुने पोस्ट ऑफिस कॉर्नर ते सेंट्रल शॉपिंग सेंटर ते भारत चौक ते अशोक चौकापर्यंत.
* पश्चिम: अशोक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते संगमनेर बस स्थानक ईशान्य कॉर्नर, पुणे नाशिक हायवे पर्यंत.

प्रभाग क्रमांक १०
* भारतनगर, रेहमत नगर, अलका नगर, काठे मळा, मौलाना आझाद मंगल कार्यालय आणि गलांडे मळा या प्रभागात येतात.
* एकूण लोकसंख्या ४१२८ असून, अनुसुचित जातीची लोकसंख्या ५७ आहे आणि अनुसुचित जमातीची लोकसंख्या ० आहे.
* या प्रभागातून दोन सदस्य निवडले जातील.
* प्रभागाच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
* उत्तर: हॉटेल लजीज, नाशिक पुणे हायवे पासून सहस्त्राअर्जुन भवनच्या मागील बाजू ते इंडिया ऑटोमोबाईल, कोल्हार-घोटी महामार्ग ते प्रवरा ऑटोमोबाईल्स समोर, कोल्हार-घोटी महामार्ग ते मास्टर ऑटो इलेक्ट्रिक वर्क्स ते नाटकीनाला ते कोल्हेवाडी रोडवर गोल्डन ऑटो पार्ट्स शॉप ते पाबळे वस्ती कॉर्नर, कोल्हेवाडी रोड पर्यंत.
* पूर्व: पाबळे वस्ती कॉर्नर, कोल्हेवाडी रोड पासून ते पाबळे वस्ती रोडने जुना जोर्वे रोड ते जुना जोर्वे रोडने न.प. हद्द (सर्वे नं. १८९) ते नवीन जोर्वे रोड नगरपरिषद हद्दीपर्यंत (सर्वे नं. १८९).
* दक्षिण: नवीन जोर्वे रोड नगरपरिषद हद्द (सर्वे नं. १८९) ते जोर्वे नाका, नाशिक पुणे हायवे पर्यंत.
* पश्चिम: जोर्वे नाका, नाशिक पुणे हायवे ते हॉटेल लजीज, नाशिक पुणे हायवे पर्यंत.

प्रभाग क्रमांक ११
* देवीगल्ली, घासबाजार, उपासणी गल्ली, तेली खुंट आणि लखमीपुरा यांचा या प्रभागात समावेश आहे.
* एकूण लोकसंख्या ४५६८ असून, अनुसुचित जातीची लोकसंख्या १७६ आणि अनुसुचित जमातीची लोकसंख्या ० आहे.
* या प्रभागातून दोन सदस्य निवडले जातील.
* प्रभागाच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
* उत्तर: गवंडीपुरा मस्जिद नैऋत्य कॉर्नर, मेन रोड ते साहिल मोबाईल शॉप, नाशिक पुणे हायवे ते तीनबत्ती चौक ते इंडिया ऑटोमोबाईल, कोल्हार-घोटी महामार्ग पर्यंत.
* पूर्व: इंडिया ऑटोमोबाईल, कोल्हार-घोटी महामार्ग ते सहस्त्राअर्जुन भवनची मागील बाजूने हॉटेल लजीज, नाशिक पुणे हायवे ते जोर्वे नाका, नाशिक पुणे हायवे पर्यंत.
* दक्षिण: जोर्वे नाका, नाशिक पुणे हायवे ते नीलकमल आईस मिल ते पाकिजा किराणा ते शेरे नेपाळ चौक, देवी गल्ली ते सिबा मेडिकल, देवी गल्ली ते उपासनी गल्लीने मोठा मारुती मंदिर पर्यंत.
* पश्चिम: मोठा मारुती मंदिर पासून चंद्रशेखर चौक ते मिरवणूक मार्गाने नेहरू चौक ते नरेंद्र टेक्सटाइल मार्केट ते मिरवणूक मार्गाने तेली खुंट ते सय्यद बाबा चौक ते गवंडीपुरा मस्जिद नैऋत्य कॉर्नर, मेन रोड पर्यंत.

प्रभाग क्रमांक १२
* गांधी चौक, कोष्टी गल्ली, अशोक चौक, मेन रोड, बाजार पेठ, पानसरे गल्ली, स्वामी विवेकानंद चौक, साईनाथ चौक, वडगल्ली, भागवत वाडा आणि कुंभार आळा या प्रभागात येतात.
* एकूण लोकसंख्या ४५४९ असून, अनुसुचित जातीची लोकसंख्या २०७ आणि अनुसुचित जमातीची लोकसंख्या ३९ आहे.
* या प्रभागातून दोन सदस्य निवडले जातील.
* प्रभागाच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
* उत्तर: नेहरू गार्डन मुख्य प्रवेश द्वार ते तहसील कार्यालय आग्नेय कॉर्नर ते बाप्ते झेरॉक्स सर्कल ते डॉक्टर मुटकुळे हॉस्पिटल ते पीरजादे यांची दर्गा कॉर्नर ते मोमीनपुरा चौक ते अशोक चौक ते भारत चौक ते सेंट्रल शॉपिंग सेंटर ते जुने पोस्ट ऑफिस, नाशिक पुणे हायवे ते साहिल मोबाईल शॉप, नाशिक पुणे हायवे पर्यंत.
* पूर्व: साहिल मोबाईल शॉप, नाशिक पुणे हायवे पासून गवंडीपुरा मस्जिद नैऋत्य कॉर्नर, मेन रोड ते मिरवणूक मार्ग सय्यद बाबा चौक ते तेली खुंट ते नरेंद्र टेक्सटाईल, नेहरू चौक पर्यंत.
* दक्षिण: नरेंद्र टेक्सटाईल, नेहरू चौक ते ओम साई गारमेंट्स ते मैड सराफ दुकान ते बाजारपेठ आराधना क्लॉथ स्टोअर ते किलबिल क्लॉथ स्टोअर, बाजारपेठ ते कॅप्टन लक्ष्मी चौक ते निमा भवन ते नगरपरिषद मेन गेट ते दत्त भवन हॉटेल/महात्मा फुले चौक, मेन रोड ते महात्मा फुले पुतळा, मेन रोड पर्यंत.
* पश्चिम: महात्मा फुले पुतळा, मेन रोड पासून नेहरू गार्डन मुख्य प्रवेश द्वार पर्यंत.

प्रभाग क्रमांक १३
* घोडेकर मळा, साईनगर, पंपिंग स्टेशन, चव्हाण पुरा, जेधे कॉलनी, माधव थिएटर समोरील वसाहत, स्वामी समर्थ मंदिर यांचा या प्रभागात समावेश आहे.
* एकूण लोकसंख्या ४९०४ असून, अनुसुचित जातीची लोकसंख्या ५५५ आणि अनुसुचित जमातीची लोकसंख्या ५१ आहे.
* या प्रभागातून दोन सदस्य निवडले जातील.
* प्रभागाच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
* उत्तर: राजापूर रोड पगूबाई गोडाऊन कॉर्नर ते म्हाळुंगी नदी व म्हाणूटीनाला यांचा संगम ते म्हाळुंगी नदी पूल ते अकोले नाका ते दत्तभवन हॉटेल/महात्मा फुले चौक, मेन रोड ते नगरपरिषद मुख्य गेट ते निमा भवन ते कॅप्टन लक्ष्मी चौक पर्यंत.
* पूर्व: कॅप्टन लक्ष्मी चौक पासून स्वामी समर्थ मंदिर कॉर्नर ते माधव टॉकीज समोरून पुनर्वसन कॉलनी ते बालम घाट ते शांती घाट, प्रवरा नदीपात्र नगरपालिका हद्दी पर्यंत.
* दक्षिण: शांती घाट, प्रवरा नदीपात्र नगरपालिका हद्दी पासून ते प्रवरा नदीने नगरपरिषद हद्दीचा नैऋत्य कॉर्नर (सर्वे नं. १४४) पर्यंत.
* पश्चिम: नगरपरिषद हद्दीचा नैऋत्य कॉर्नर (सर्वे नं. १४४) ते मालपाणी हेल्थ क्लब ते काशीआई माता चौक ते राजपाल किराणा कॉर्नर ते राजापूर रोड पगू बाई गोडाऊन कॉर्नर पर्यंत.

प्रभाग क्रमांक १४
* रंगार गल्ली, चंद्रशेखर चौक, पेटिट विद्यालय, खंडोबा गल्ली, वाडेकर गल्ली, परदेशपुरा, अँग्लो-उर्दू हायस्कूल या प्रभागात येतात.
* एकूण लोकसंख्या ४७५३ असून, अनुसुचित जातीची लोकसंख्या २२ आणि अनुसुचित जमातीची लोकसंख्या १२ आहे.
* या प्रभागातून दोन सदस्य निवडले जातील.
* प्रभागाच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
* उत्तर: किलबिल क्लॉथ स्टोअर, बाजार पेठ ते आराधना क्लॉथ स्टोअर, बाजार पेठ पर्यंत.
* पूर्व: आराधना क्लॉथ स्टोअर, बाजार पेठ ते मैड सराफ दुकान ते ओम साई गारमेंट ते नरेद्र टेक्सटाईल ते मिरवणूक मार्गाने मोठा मारुती मंदिर ते उपासनी गल्ली कॉर्नर ते सिबा मेडिकल, देवी गल्ली ते डी.एड. कॉलेज प्रवेश द्वार ते रईसखान बशीर खान यांचे घर ते रुबाबखान गफूरखान यांचे घर ते अमरधाम प्रवेश द्वार ते स्मशानभूमी रोड, पुणे-नाशिक पुणे हायवे, प्रवरा नदी पुल नगरपरिषद हद्द पर्यंत.
* दक्षिण: पुणे-नाशिक पुणे हायवे, प्रवरा नदी पुल नगरपरिषद हद्द ते शांती घाट, प्रवरा नदी पात्र नगर परिषद हद्द पर्यंत.
* पश्चिम: शांती घाट, प्रवरा नदी पात्र नगर परिषद हद्द ते बालम घाट ते पुनर्वसन कॉलनी, माधव टॉकीज समोर ते समर्थ मंदिर कॉर्नर ते कॅप्टन लक्ष्मी चौक ते किलबिल क्लॉथ स्टोअर, बाजार पेठ पर्यंत.

प्रभाग क्रमांक १५
* नाईकवाडपुरा, डाके मळा, जोर्वे रोड, यंग नॅशनल स्पोर्ट्स ग्राउंड, पुणे नाका आणि अमरधाम यांचा या प्रभागात समावेश आहे.
* एकूण लोकसंख्या ४३९७ असून, अनुसुचित जातीची लोकसंख्या २ आणि अनुसुचित जमातीची लोकसंख्या ९ आहे.
* या प्रभागातून दोन सदस्य निवडले जातील.
* प्रभागाच्या सीमा खालीलप्रमाणे आहेत:
* उत्तर: शेरे नेपाळ चौक, देवी गल्ली ते पाकिजा किराणा ते नीलकमल आईस मिल ते जोर्वे नाका, नाशिक पुणे हायवे ते नवीन जोर्वे रोड नगरपरिषद हद्दीपर्यंत (सर्वे नं. १९०).
* पूर्व: नवीन जोर्वे रोड नगरपरिषद हद्दीपर्यंत (सर्वे नं. १९०) ते नगरपरिषद हद्द (सर्वे नं. १९१ व १९२) ते प्रवरा नदी दक्षिण किनारा (सर्वे नं. १९३) न.प. हद्दीपर्यंत.
* दक्षिण: प्रवरा नदी दक्षिण किनाऱ्या (सर्वे नं. १९३) नगरपरिषद हद्दी पासून ते प्रवरा नदी पात्राने पुणे-नाशिक हायवे, प्रवरा नदीवरील पुल नगरपरिषद हद्दी पर्यंत.
* पश्चिम: प्रवरा नदी पात्राने पुणे-नाशिक हायवे, प्रवरा नदीवरील पुल नगरपरिषद हद्दी पासून ते अमरधाम प्रवेशद्वार ते रुबाब खान गफूर खान यांचे घर ते रईस खान बशीर खान यांचे घर ते डी.एड. कॉलेज गेट ते शेरे नेपाळ चौक, देवी गल्ली पर्यंत.
ही माहिती रामदास कोकरे, मुख्याधिकारी, संगमनेर नगरपरिषद यांनी जिल्हाधिकारी अहिल्यानगर आणि विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांना दिली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,074
प्रभाग रचना संगमनेर नगरपरिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

04/05/2026

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी रणधुमाळी सुरू; १२ मे रोजी मतदान आणि निकाल, पाहा संपूर्ण वेळापत्रक!

16/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

By Annant Ppangarkar21/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा, मावा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री…

आज शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

21/08/2026

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

20/08/2026

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

20/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.