महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
अहिल्यानगर: शहरातील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहायक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे आणि चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक रामचंद्र गायकवाड यांना लाच प्रकरणी एसीबी ने ताब्यात घेतले आहे. गांजा प्रकरणात मदत करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करून दीड लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्यांना रंगेहाथ पकडले. या घटनेने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका गांजा प्रकरणात तक्रारदाराला आरोपी न बनवता साक्षीदार बनवण्यासाठी सहायक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम १.५० लाख रुपये निश्चित झाली.
पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. गुरुवारी रात्री या सापळ्यात, अशोक गायकवाड यांनी तक्रारदाराकडून १.५० लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्यावेळी सहायक फौजदार गर्गे यांनीही या मागणीस प्रोत्साहन दिल्याचे समोर आले. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.
एसीबीने ताब्यात घेतलेले अशोक रामचंद्र गायकवाड (वय ७१) हे चळवळीतील ज्येष्ठ नेते असून त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. त्यांचे अनेक बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते. तर राजेंद्र प्रभाकर गर्गे (वय ५७) हे कोतवाली पोलिस ठाण्यात सहायक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा पोलिस दलात चांगला दबदबा आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हा राजकीय डाव आहे की जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न, यावर चर्चा सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पोलिस निरीक्षक नेहा तुषार सूर्यवंशी आणि पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
लाच प्रकरणी सहाय्यक फौजदारासह जिल्ह्यातील बडा राजकीय नेता एसीबीच्या जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
या घटनेने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.





पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,