महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
शहरातील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांवर जालना पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम’ अर्थात ‘मोक्का’ (MCOCA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहे.
भोकरदन नाका परिसरातील व्यापारी चंदन बंसतीलाल गोलेच्छा यांना धमकावून खंडणी मागणारे विठ्ठल अंभोरे, अक्षय गाडेकर आणि राहुल गंगावणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासात असे समोर आले की, मुख्य आरोपी विठ्ठल अंभोरे आणि त्याच्या साथीदारांचा एक पूर्वेतिहास आहे. त्यांनी जालना तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक गंभीर गुन्हे केले आहेत.
या टोळीचा वाढता उपद्रव लक्षात घेता, पोलिसांनी त्यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्याची परवानगी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागितली होती. परवानगी मिळताच, या आरोपींविरुद्ध ‘मोक्का’ कायदा लावण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक कठोरपणे केला जाईल. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी करत आहेत.
व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी मागणारे ‘मोक्का’ कायद्याखाली
व्यापारी चंदन बंसतीलाल गोलेच्छा यांना धमकावून खंडणी मागणारे विठ्ठल अंभोरे, अक्षय गाडेकर आणि राहुल गंगावणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.





या टोळीचा वाढता उपद्रव लक्षात घेता, 
