महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: शहरातील मालदाड रोड परिसरात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सुमारे दोन लाख रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
शहर पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मालदाड रोड परिसरात माऊली कॉलनीमध्ये सेवानिवृत्त अधिकारी रामनाथ म्हातारबा सातपुते (वय ६५) हे आपल्या पत्नीसह राहतात. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरात ही घटना घडली.
चोरट्यांनी वॉल कंपाउंड वरून उडी मारून घराच्या दरवाजाचा कडे कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व ९६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. यात सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तीन लाख एक हजार आठशे वीस रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला.
सातपुते यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरात चोरी, दागिने आणि रोकड लंपास; शहर पोलिसात गुन्हा दाखल
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.





चोरट्यांनी वॉल कंपाउंड वरून उडी मारून घराच्या दरवाजाचा कडे कोयंडा तोडून आत
