Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगरच्या FDA विरोधात सामाजिक कार्यकर्त्याचे संगमनेरमध्ये आमरण उपोषण: नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर कारवाईची मागणी
आंदोलन

अहिल्यानगरच्या FDA विरोधात सामाजिक कार्यकर्त्याचे संगमनेरमध्ये आमरण उपोषण: नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर कारवाईची मागणी

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि भेसळखोरांना क्लीनचीट देणाऱ्या अहिल्यानगरच्या अन्न व औषध प्रशासनाविरोधात हे उपोषण आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या गुळातील भेसळीवर अन्न व औषध प्रशासन (FDA) कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते शंकर रावसाहेब ढमाले यांनी गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) संगमनेर येथील प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गुळात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि भेसळखोरांना क्लीनचीट देणाऱ्या अहिल्यानगरच्या अन्न व औषध प्रशासनाविरोधात हे उपोषण आहे.

ढमाले यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना सांगितले की, शहरातील सिद्धी गुळ नैसर्गिक गुळ या नावाने विकला जाणारा गुळ खरेदी केल्यानंतर या गुळामुळे त्यांना आजारपणाचा सामना करावा लागला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या गुळात भेसळ असल्याचा संशय आल्याने त्यांनी खासगी लॅबमध्ये गुळाची तपासणी केली. त्या तपासणीत गुळात भेसळ असल्याचा अहवाल आला. त्यानंतर त्यांनी अहिल्यानगर येथील FDA विभागाकडे तक्रार दाखल केली. मात्र, FDA ने या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही.

माहिती अधिकारांतर्गत कारवाईची माहिती मागितल्यावर ती दोन वेळा नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी नाशिक येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील केले. FDA अधिकारी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्याने ढमाले यांनी उपोषणाचा निर्णय घेतला.

भेसळखोरांना पाठीशी घालण्याचा आरोप- ढमाले यांनी आरोप केला आहे की, संगमनेर शहरात आणि तालुक्यात गुळातील भेसळीसोबतच आणखी सात ते आठ भेसळीची प्रकरणे आहेत, ज्यांच्याबद्दल FDA कडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तरीही या विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.

अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी भेसळयुक्त उत्पादकांच्या मालकांना पाठीशी घालत आहेत. यात काहीतरी काळेबेरे असल्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप ढमाले यांनी केला.

या प्रकारामुळे प्रशासनाकडून आपल्याला न्याय मिळणार नाही असे वाटल्याने अखेरीस ढमाले यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. आता भेसळखोरांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 727
अन्न व औषध प्रशासन विभाग उपोषण शंकर ढमाले
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.