Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार खताळ यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये मूक मोर्चा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केला निषेध
आंदोलन

आमदार खताळ यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये मूक मोर्चा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केला निषेध

मोर्चात पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह आमदार विठ्ठलराव लंघे आणि महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

एका हल्ल्याने तालुक्याचा आमदार बदलला आता संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा खरा निषेध करायचा असेल, तर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीतही भगवा फडकला पाहिजे, असे म्हणत कार्यकर्त्यांना आवाहन करत आपणही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही, खताळ यांच्यावर झालेली घटना अचानक घडलेली नाही. याचा सूत्रधार पोलिसांनी शोधावा. तसेच याप्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महायुतीने आज, शुक्रवारी प्रांत अधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

विखे म्हणाले, तालुका दहशतीखाली ठेवण्यासाठी विरोधकांचा कार्यक्रम करायचा हा प्रकार अनेक वर्षे संगमनेर तालुक्यात झालेला आहे. पराभवाचे दुःख त्यांना अजूनही पचवता येत नाही. लोकशाही मान्य नसल्याने ते आता ठोकशाहीवर आले आहेत. त्यांच्या या प्रवृत्तीमुळेच लोकांनी त्यांना घरी बसवले. तसेच वेळ आली तर जशास तसे उत्तर देण्याची आपलीही तयारी आहे, अशा शब्दांत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्ला चढवला.

कीर्तनकारापाठोपाठ आमदारावर हल्ला करण्याचा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला. याच दहशतीच्या विरोधात आमदार खताळ उभे आहेत. तालुक्याच्या विकासाचा मार्ग त्यांनी खुला करून दिला आहे. त्यांनी वर्षानुवर्ष तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवले, मात्र, आपण विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार तालुक्याच्या सर्व भागात पाणी फिरवून तालुका दुष्काळमुक्त केला. हेच त्यांना पाहवत नसल्याने त्यांचे खरे रूप कालच्या घटनेतून तालुक्याला कळले आहे.

आमदार खताळ म्हणाले, कोणाच्या तरी हस्तकाने आपल्यावर हा भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्याने आपण खचणार नाही अथवा विचलितही होणार नाही. सध्या उत्सवाचे दिवस सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी उद्रेक न करता शांतता ठेवावी. पोलीस योग्य तपास करून सत्य सर्वांसमोर आणतील. आमदार लंघे यांनीही या घटनेचा निषेध केला. श्रीराम गणपुले, अविनाश थोरात, आप्पा केसेकर, शौकत जहागीरदार आदींची यावेळी निषेधपर भाषणे झाली.

मोर्चात पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह आमदार विठ्ठलराव लंघे आणि महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,136
अमोल खताळ मूक मोर्चा राधाकृष्ण विखे हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.