अहिल्यानगर-
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत, गावठी कट्ट्यांची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूरमध्ये सापळा रचून तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ५ गावठी कट्टे, ९ जिवंत काडतुसे आणि एक पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेने ही विशेष मोहीम सुरू केली होती. गोपनीय माहिती मिळाली होती की काही तरुण मध्य प्रदेशमधून गावठी कट्टे आणून श्रीरामपूरमध्ये त्यांची विक्री करणार आहेत.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी आपल्या पथकासह श्रीरामपूर शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या हरेगाव फाट्यावर सापळा रचला.
या कारवाईत पोलिसांनी अक्षय उर्फ भावड्या संजय माळी (वय २३, रा. फत्तेपूर, नेवासा), अजय शिवाजी मगर (वय २५, रा. नांदूर शिखरी, नेवासा) आणि योगेश मच्छिंद्र निकम (वय ३५, रा. वडगावगुप्ता) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीमध्ये हे शस्त्रसाठा आणि मोटरसायकल सापडली.
या तिघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत अंमलदार पंकज व्यवहारे, अतुल लोटके, उमेश खेडकर, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, दीपक घाटकर, फुरकान शेख, प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे यांचा समावेश होता.
गावठी कट्ट्यांची तस्करी: तिघे अटकेत, ५ कट्टे आणि ९ काडतुसे जप्त
कारवाईत अंमलदार पंकज व्यवहारे, अतुल लोटके, उमेश खेडकर, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, दीपक घाटकर, फुरकान शेख, प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे यांचा समावेश होता.



अहिल्यानगर- 
या माहितीच्या आधारे गुन्हे
