अकोले-
अकोले तालुक्यातील राजूर येथे सुरू असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या अवैध विक्री केंद्रावर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात सुमारे ६ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एक आरोपी फरार आहे.
गुप्त माहितीच्या आधारे, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे पोहोचले. तिथे पांडुरंग लक्ष्मण सदगीर (वय ४०, रा. वारंघुशी) याच्या घरासमोर अवैधरित्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा आढळून आला. हा साठा कोणताही परवाना नसताना, जीव धोक्यात घालून विक्रीसाठी ठेवला होता.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पांडुरंग सदगीरने दिलेल्या माहितीनुसार, तो हे पेट्रोल आणि डिझेल लक्ष्मण उर्फ पांडू तानाजी घोंगडे (रा. पाडळी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) याच्याकडून कमी दरात खरेदी करत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून पेट्रोल आणि डिझेलने भरलेले सहा प्लास्टिक ड्रम आणि महिंद्रा बोलेरो कंपनीची पिकअप गाडी असा एकूण ६ लाख ४१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक राहुल कचूरु डोके यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, पांडुरंग सदगीर आणि फरार आरोपी लक्ष्मण उर्फ पांडू घोंगडे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८७, ३(५) तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ च्या कलम ३, ७, ६(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजूर पोलीस करत आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश लबडे, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस नाईक श्यामसुंदर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल मनोज साखरे आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल भांड यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
अवैध पेट्रोल-डिझेल विक्री केंद्रावर एलसीबीच्या पथकाचा छापा; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश लबडे, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस नाईक श्यामसुंदर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल मनोज साखरे आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल भांड यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.



अकोले- 
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या
