Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

21/08/2026

आज शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

21/08/2026

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

20/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरसह जिल्ह्यातील ११ पालिका आणि एका नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेवर हरकती दाखल, सुनावणी प्रक्रिया सुरू
निवडणूक

संगमनेरसह जिल्ह्यातील ११ पालिका आणि एका नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेवर हरकती दाखल, सुनावणी प्रक्रिया सुरू

संगमनेरसाठी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांची नेमणूक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर:

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या एकूण २७२ हरकतींवर सुनावणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकाऱ्यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. या अधिकाऱ्यांनी हरकतींवर सुनावणी सुरू केली असून, त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

हरकतींची संख्या आणि सुनावणीचे वेळापत्रक- नगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, शिर्डी, देवळाली प्रवरा, श्रीगोंदे, शेवगाव, पाथर्डी, जामखेड या ११ नगरपरिषदा आणि नेवासे नगरपंचायत अशा एकूण १२ पालिकांमध्ये गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना १८ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली होती, त्यावर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या.

एकूण २७२ हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींची सुनावणी ८ सप्टेंबरपर्यंत चालेल आणि ९ सप्टेंबरला अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला जाईल. अंतिम आराखडा ११ सप्टेंबरपर्यंत नगर विकास विभागाला आणि त्यानंतर १२ ते १८ सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. अंतिम प्रभाग रचना २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान जाहीर केली जाणार आहे.

सर्वात जास्त ९० हरकती जामखेडमध्ये दाखल झाल्या आहेत. याउलट, शिर्डीमध्ये फक्त एक आणि देवळाली प्रवरामध्ये फक्त तीन हरकती आल्या आहेत.

इतर पालिकांमधील हरकतींची संख्या:

 * पाथर्डी: २

 * कोपरगाव: १०

 * शेवगाव: २७

 * संगमनेर: ३३

 * श्रीगोंदे: ६

 * राहाता: ५

 * राहुरी: १६

 * श्रीरामपूर: ४५

 * नेवासे: ३३

हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खालीलप्रमाणे उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे:

 * सायली सोळंके: कोपरगाव

 * अरुण उंडे: संगमनेर

 * किरण सावंत पाटील: श्रीरामपूर

 * नितीन पाटील: जामखेड

 * सुभाष दळवी: शेवगाव

 * प्रसाद मते: पाथर्डी

 * माणिक आहेर: राहाता

 * अनुपसिंह यादव: राहुरी

 * गौरी सावंत: देवळाली प्रवरा

 * सुधीर पाटील: नेवासे

 * अतुल चोरमारे: शिर्डी

 * श्रीकुमार चिंचकर: श्रीगोंदा

या सर्व सुनावण्या संबंधित तहसील, उपविभागीय कार्यालय किंवा संबंधित नगरपरिषदेच्या कार्यालयात घेतल्या जाणार आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,024
नगरपरिषद निवडणूक हरकती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

04/05/2026

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी रणधुमाळी सुरू; १२ मे रोजी मतदान आणि निकाल, पाहा संपूर्ण वेळापत्रक!

16/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध गुटखा माफियांचे कंबरडे मोडले; स्थानिक गुन्हे शाखेची तब्बल ९४ लाख ६८ हजारांच्या मुद्देमालासह ५८ आरोपींवर धडक कारवाई

By Annant Ppangarkar21/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा, मावा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री…

आज शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

21/08/2026

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

20/08/2026

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

20/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.