Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एकनाथ सखाराम ताजणे यांचे निधन: शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान – डॉ. सुजय विखे
श्रद्धांजली

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एकनाथ सखाराम ताजणे यांचे निधन: शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान – डॉ. सुजय विखे

त्यांनी शाळांच्या पायाभूत सुविधा, विज्ञान प्रयोगशाळा, वाचनालय आणि खेळाचे मैदान विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या पुढाकाराने सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन मिळाले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आश्वी | वार्ताहर

संगमनेर तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त हेडमास्तर एकनाथ सखाराम ताजणे (वय ७९) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. विखे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आश्वी बुद्रुक येथील ताजणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

डॉ. विखे यांनी ताजणे यांच्या योगदानाला आदराने गौरवताना सांगितले, कै. एकनाथ ताजणे यांनी आपले संपूर्ण आयुष्य ज्ञानदानाच्या कार्यात समर्पित केले. त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवल्या, जे आज विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. ते केवळ एक शिक्षक नव्हते, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण संवर्धन अशा उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने आपण एक प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि प्रेमळ शिक्षक गमावला आहे.

ताजणे गुरुजींनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक शाळांमध्ये सेवा दिली. प्रेमगिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर ओझर बुद्रुक, दाढ खुर्द, वनकुटे, मनोली, आणि मांलुजे येथील शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

विशेषतः, आश्वी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १८ वर्षे आणि पेमगिरी शाळेत १२ वर्षे सेवा देत असताना त्यांनी शाळांच्या पायाभूत सुविधा, विज्ञान प्रयोगशाळा, वाचनालय आणि खेळाचे मैदान विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या पुढाकाराने सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन मिळाले.

तालुका हेडमास्तर म्हणून त्यांनी संपूर्ण तालुक्यात शाळा दर्जावाढ मोहीम, शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा, आणि शाळा सुशोभीकरण असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शाळांना जिल्हा आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. ताजणे गुरुजींचा दृष्टिकोन केवळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या चारित्र्य घडणी, अनुशासन आणि मूल्य शिक्षणावर विशेष भर दिला.

सांत्वन भेटीवेळी पत्रकार वैभव ताजणे, प्रेस फोटोग्राफर सचिन ताजणे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी पुष्पावती ताजणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात प्रतीक्षा डाके, गीतांजली भुजबळ, नामदेव ताजणे, सोमनाथ ताजणे, नितीन ताजणे, रामनाथ ताजणे, योगेश ताजणे, सरुनाथ उंबरकर, सरपंच सुशिला मेहेत्रे, दादा पाटील मेहेत्रे, युवा नेते संतोष मेहेत्रे, भानुदास पवार, अमोल ताजणे आणि नवनाथ ताजणे यांचा समावेश होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,092
एकनाथ ताजणे वैभव ताजने सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.