Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; दर्शन घेऊन परतणारे बोटा येथील ५ भाविक गंभीर जखमी

June 11, 2026

आज गुरुवार, ११ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 11, 2026

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुर्दैवी अंत: चुलत बहिणीच्या आत्महत्येपाठोपाठ समोर आली दुसरी घटना, पतीने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या; संगमनेर हादरले
गुन्हेगारी

दुर्दैवी अंत: चुलत बहिणीच्या आत्महत्येपाठोपाठ समोर आली दुसरी घटना, पतीने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या; संगमनेर हादरले

फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच घटनेचा नेमका उलगडा होईल.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 8, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: 

गणेश विसर्जनाच्या दिवशी संगमनेरच्या पठार भागातील साकुर मध्ये दोन सख्या चुलत बहिणींनी आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच त्या पाठोपाठ संगमनेर शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केलेल्या एका दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. 

पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही घटना शहरातील इंदिरानगर परिसरातील जय जवान चौकात घडली. या दुर्दैवी घटनेत वैष्णवी संजय खांबेकर (वय २२) आणि तिचा पती कुलदीप सुनील अडांगळे (वय ३५) यांचा अंत झाला.

वैष्णवी आणि कुलदीप यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघेही जय जवान चौकातील घरात राहत होते. या संदर्भात अद्याप पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाली नसून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघांमध्ये सतत घरगुती वाद होत होते. रविवारी सकाळी त्यांच्यातील वादाने उग्र रूप धारण केले आणि त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली असावी, असा कयास आहे.

रविवारी सकाळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना घरात वैष्णवीचा मृतदेह खाली पडलेल्या अवस्थेत आढळला, तर कुलदीपचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी तात्काळ दोन्ही मृतदेह घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

कुलदीपच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर, रविवारी संध्याकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, वैष्णवीचा मृतदेह पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी लोणी प्रवरानगर येथे पाठवण्यात आला आहे. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच घटनेचा नेमका उलगडा होईल.

वैष्णवी ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत होती. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाची नोंद शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असल्याची माहिती मिळत असून, लवकरच या घटनेमागील सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,356
आत्महत्या हत्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; दर्शन घेऊन परतणारे बोटा येथील ५ भाविक गंभीर जखमी

By अनंत पांगारकरJune 11, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन घारगाव (संगमनेर): कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील गुळंजवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत बुधवारी…

आज गुरुवार, ११ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 11, 2026

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.