अहिल्यानगर-
जिल्ह्यातील एका ग्रामसेवकाला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ५ सप्टेंबर) दिलीप संजय मिसाळ (वय ३९, रा. खेटाकळी, ता. शेवगाव) या ग्रामसेवकाला अमोल चंद्रकांत गवळी (रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी) या व्यक्तीने अडवले. आरोपी गवळीने ग्रामसेवक मिसाळ यांना बंदुकीचा धाक दाखवून, ऐ ग्रामसेवक, माझ्याकडे बंदूक आहे, यातील सहा गोळ्या तुझ्या… घालीन, अशी धमकी दिली.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तू आमच्या विरोधकांचे ऐकून काम करत होतास, आता आमचे नेते खासदार आहेत, आम्ही फक्त तुमची आणि विरोधकांची जिरवणार, असे धमकावले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अमोल गवळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे करत आहेत.
ग्रामसेवकाला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी
उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.



अहिल्यानगर- 
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार,
