संगमनेर –
ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत परवानगी नसतानाही मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोन डीजे वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे परिसरात विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही डीजे वाहने जप्त केली असून, आयोजकांचाही शोध सुरू आहे.
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांकडून ही कठोर भूमिका घेतली असून, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार कोणताही लाऊड स्पीकर किंवा डीजे वाजवण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी देताना आवाजाची पातळी (डेसिबल मीटर) आणि वेळेचे नियम पाळणे आवश्यक असते. मात्र, काल शहरात आयोजित केलेल्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी पोलिसांकडून लाऊड स्पीकर आणि डीजे वापरण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीही, मिरवणुकीत काही ठिकाणी डीजे वाहने सामील करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या गंभीर प्रकारानंतर संगमनेर शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दोन डीजे वाहनांवर गुन्हे दाखल केले. भारतीय न्याय संहिता कलम २२३, पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३, १५, आणि ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, मिरवणुकीत डीजे बोलावणाऱ्या आयोजकांनाही लवकरच सह-आरोपी करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
संगमनेरमध्ये डीजेच्या दणदणाटावर कारवाई, ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल; आयोजकांनाही सह-आरोपी करणार
मिरवणुकीत डीजे बोलावणाऱ्या आयोजकांनाही लवकरच सह-आरोपी करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.



संगमनेर –
या गंभीर प्रकारानंतर संगमनेर शहर पोलिसांनी
