Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप
न्यायालय

दोन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप

पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Close-up Of Male Judge In Front Of Mallet Holding Documents
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दोन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप

श्रीरामपूर –

श्रीरामपूर तालुक्यात एका दोन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घृणास्पद घटनेत, विशेष न्यायालयाने आरोपी भास्कर धाकू मोरे याला मरेपर्यंत जन्मठेप आणि १० हजार रुपयांच्या दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालाने पीडितेला न्याय मिळाला असल्याचे मानले जात आहे.

पीडित चिमुरडीला लघवी करताना त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी आणले असता, तपासणी करणाऱ्या परिचारिकेला तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी केली असता, चिमुरडीने आरोपी भास्कर मोरे याने केलेल्या कृत्याची माहिती दिली. तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती.

या घटनेची गंभीर दखल घेत, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तात्काळ भारतीय दंड विधान कलम ३७६ (अ) (ब) सह पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. एन. साळवे यांच्या न्यायालयात झाली. यात एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, यात पीडितेची आई, तपास करणाऱ्या परिचारिका आणि ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. सरकारी पक्षाने सादर केलेले भक्कम पुरावे आणि साक्षीदारांच्या महत्त्वाच्या पुराव्यामुळे न्यायालयाला आरोपीला दोषी ठरवणे शक्य झाले.

सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील पी. पी. गटणे आणि एम. आर. नवले यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा दावा स्वीकारून आरोपीचा बचाव फेटाळला आणि त्याला मरेपर्यंत जन्मठेप व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

या प्रकरणाच्या तपासात पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. घाणे आणि हवालदार ठोंबरे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 889
जन्मठेप न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.