Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » फिजिओथेरपिस्टना ‘डॉक्टर’ ही पदवी वापरता येणार नाही: डीजीएचएसचा महत्त्वाचा निर्णय
आरोग्य

फिजिओथेरपिस्टना ‘डॉक्टर’ ही पदवी वापरता येणार नाही: डीजीएचएसचा महत्त्वाचा निर्णय

या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयएमएच्या कलम ७, ६, आणि ६ (अ) अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नवी दिल्ली – 

आरोग्य सेवा महासंचालनालयाने (डीजीएचएस) फिजिओथेरपिस्टसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. डीजीएचएसने फिजिओथेरपिस्टना त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही पदवी लावण्यास मनाई केली आहे, कारण ते वैद्यकीय डॉक्टर नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

डीजीएचएसच्या डॉ. सुनिता शर्मा यांनी एका पत्राद्वारे सांगितले की, फिजिओथेरपिस्टनी ‘डॉक्टर’ ही पदवी वापरणे हे इंडियन मेडिकल डिग्री ऍक्ट १९१६ चे उल्लंघन आहे. हे पत्र त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली यांना पाठवले आहे.

पत्रात म्हटले आहे की, फिजिओथेरपिस्ट हे प्रशिक्षित वैद्यकीय डॉक्टर नाहीत. त्यामुळे त्यांनी ‘डॉक्टर’ ही पदवी वापरू नये. यामुळे रुग्ण आणि सामान्य नागरिकांची दिशाभूल होऊ शकते. डॉ. शर्मा यांनी पुढे म्हटले की, फिजिओथेरपिस्टना प्राथमिक वैद्यकीय उपचार करण्याची परवानगी नाही. त्यांना केवळ रेफर केलेले उपचार करण्याचीच परवानगी आहे. त्यांना वैद्यकीय समस्यांचे निदान करण्याचे प्रशिक्षण मिळालेले नाही, ज्यामुळे वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

या निर्णयाच्या समर्थनार्थ, पत्रात विविध न्यायालयांच्या आदेशांचा संदर्भ देण्यात आला आहे, यात पटना आणि मद्रास उच्च न्यायालयांचा समावेश आहे. तसेच, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियानेही यापूर्वीच फिजिओथेरपिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्टना ‘डॉक्टर’ ही पदवी वापरण्यास मनाई केली आहे.

याआधी, एप्रिलमध्ये नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थ प्रोफेशन्स (एनसीएएचपी) ने फिजिओथेरपिस्ट ‘डॉक्टर’ ही पदवी वापरू शकतात, असे जाहीर केले होते. 

मात्र, आता डीजीएचएसने यावर स्पष्टीकरण दिले आहे की, ‘डॉक्टर’ ही पदवी केवळ नोंदणीकृत मॉडर्न मेडिसिन, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी उपचार करणाऱ्यांनाच वापरता येते. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयएमएच्या कलम ७, ६, आणि ६ (अ) अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 494
आरोग्य आरोग्य सेवा महासंचालनालय डॉक्टर फिजिओथेरपिस्ट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.