Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डीत अल्पवयीन मुलांना भीक मागण्यास, हार-फुले-फोटो विकण्यास लावणाऱ्या पालकांवर गुन्हे दाखल; अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पहिलीच मोठी कारवाई
गुन्हेगारी

शिर्डीत अल्पवयीन मुलांना भीक मागण्यास, हार-फुले-फोटो विकण्यास लावणाऱ्या पालकांवर गुन्हे दाखल; अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पहिलीच मोठी कारवाई

मोहिमेची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केवळ मुलांची सुटका करून ती आधारगृहात पाठवण्यावर ही कारवाई थांबली नाही. मुलांचे शैक्षणिक भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आणि त्यांना दुर्लक्षित आयुष्य जगण्यास भाग पाडणाऱ्या त्यांच्या पालकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 12, 2025Updated:September 12, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डीत अल्पवयीन मुलांना भीक मागण्यास, हार-फुले-फोटो विकण्यास लावणाऱ्या पालकांवर गुन्हे दाखल; अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पहिलीच मोठी कारवाई

शिर्डी- 

शिर्डीत भीक मागणाऱ्या आणि विविध वस्तू विकणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या पालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली, यामध्ये १२ मुलांना बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले. शिर्डी मंदिर परिसरात अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या कारवाईमध्ये, भीक मागणे, हार, फुले आणि फोटो विकणे अशा कामांमध्ये गुंतलेल्या १२ मुलांची सुटका करण्यात आली. या मुलांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले होते. काही मुले नशेच्या आहारी जाऊन भाविकांना त्रास देत असल्याच्या तक्रारीही आल्या होत्या. 

पोलिसांनी या मुलांचे जबाब नोंदवून त्यांना बाल कल्याण समितीसमोर हजर केले. समितीच्या आदेशानुसार, या मुलांना संगमनेर आणि श्रीरामपूर येथील आधारगृहांमध्ये पाठवण्यात आले आहे.

या मोहिमेची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केवळ मुलांची सुटका करून ती आधारगृहात पाठवण्यावर ही कारवाई थांबली नाही. मुलांचे शैक्षणिक भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आणि त्यांना दुर्लक्षित आयुष्य जगण्यास भाग पाडणाऱ्या त्यांच्या पालकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिर्डी पोलीस ठाण्यात बाल न्याय अधिनियम, कलम ७५ आणि ७६ नुसार, १२ मुलांच्या १२ पालकांवर गुन्हे नोंदवले गेले आहेत. हे गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असून, पालकांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून शिर्डी शहरात अशाच अल्पवयीन मुलांकडून विविध गुन्हे घडल्याचेही समोर आले होते. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची ठरली असल्याचे वाघचौरे यांनी सांगितले. भाविकांचे शिर्डीतील आगमन, वास्तव्य आणि परतीचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी ही मोहीम घेण्यात आली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,012
अल्पवयीन मुले कारवाई सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.