Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ज्यांनी काहीच केलं नाही असे लोक सध्या जलदूत व्हायला निघालेत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा विरोधकांवर हल्लाबोल
शेती व सहकार

ज्यांनी काहीच केलं नाही असे लोक सध्या जलदूत व्हायला निघालेत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा विरोधकांवर हल्लाबोल

35 वर्ष खासदार असताना आपण एक खडा तरी उचलला का असा थेट सवाल करत चाळीस वर्षात काय केले, असा प्रश्न विचारणाऱ्यांना आता संगमनेरकरांनी उत्तर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/09/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:

ज्यांनी काहीच केलं नाही असे लोक सध्या जलदूत व्हायला निघाले आहेत, ‘वांझोटीला पोरं होईल पण निळवंडे होणार नाही’ असं म्हणत हिणवणाऱ्या विरोधकांवर राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला. संगमनेर तालुक्याचा गौरवशाली इतिहास आणि विकासाचा वारसा जपण्याची जबाबदारी नवीन पिढीची आहे, असे सांगताना या तालुक्यातील विकासाचा इतिहास देखील विसरता कामा नये असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी हे परखड मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे माजी अध्यक्ष, साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, जयश्री थोरात, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, लक्ष्मण कुटे आणि शंकर खेमनर आदीसह विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

थोरात म्हणाले, मोठ्या मेहनतीतून संगमनेरमध्ये उभे राहिलेले हे विकासाचे वैभव पुढच्या पिढीला कसं आलं हे माहिती नाही. मोबाईलवर येणाऱ्या चुकीच्या गोष्टी त्यांना खऱ्या वाटत आहे. कोणी पाणी आणलं कोणी त्यासाठी मदत केली हे आपण विसरून जातो. तालुक्याचा विकास जर पुढील काळात टिकवायचा असेल तर त्यामागील इतिहासही लक्षात ठेवावा लागेल. या तालुक्याचा विकास मोडण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहे. 35 वर्ष खासदार असताना आपण एक खडा तरी उचलला का असा थेट सवाल करत चाळीस वर्षात काय केले, असा प्रश्न विचारणाऱ्यांना आता संगमनेरकरांनी उत्तर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

राज्यात सत्ता बदलल्यानंतर संगमनेर तालुक्यात सूडबुद्धीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप थोरात यांनी केला. त्यांनी म्हटलं की, विरोधकांकडून खोटे गुन्हे, जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यासारखे गंभीर गुन्हे कार्यकर्त्यांवर दाखल केले जात आहे. पोलिसांचा वापर घरगड्यासारखा केला जात असून, यामुळे दररोज न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन घ्यावे लागत आहेत. या परिस्थितीचा जनतेने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

आपल्या भाषणात थोरात यांनी संगमनेरच्या विकासाची गौरवगाथा सांगितली. आपण कोणते राजकीय ध्येय समोर न ठेवता तालुक्याचा विकास प्रामाणिकपणे केला. ही आपली चूक ठरली का असे स्पष्ट करत त्यांनी म्हटलं की, ज्यांनी चाळीस वर्षांत काहीच केलं नाही ते आता प्रश्न विचारत आहेत. निळवंडे धरणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, हे नव्या पिढीला माहीत नाही. त्यांनी आठवण करून दिली की, त्यावेळी काही लोक ‘वांझोटीला पोरं होईल पण निळवंडे होणार नाही’ असं म्हणत हिणवत होते. मात्र, आज निळवंडेचे पाट भरून वाहत आहेत. भंडारदराचं ३० टक्के पाणी मिळवण्यातही आपण यशस्वी झालो. निळवंडे च्या कामात आपल्याला मधुकरराव पिचड यांनी सर्वाधिक मदत केल्याचं त्यांनी सांगितलं.

थोरात यांनी सहकार चळवळीतील योगदानाला उजाळा दिला. त्यांनी म्हटलं की, अण्णासाहेब शिंदे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांसारख्या नेत्यांचं कारखान्याच्या उभारणीत मोलाचं योगदान आहे. शेतकरी हजार तोंडाच्या रावणासोबत लढत असतो. प्रत्येक टप्प्यावर त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. कधी ऊस कमी, कधी पाऊस नाही, तर कधी रोगराईचं संकट. अशा परिस्थितीतही शेतकरी प्रामाणिकपणे लढत असतो. भविष्यात हेक्टरी नाही तर एकरी १०० टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन घेण्यावर भर देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं, जेणेकरून कारखान्याला बाहेरून ऊस आणण्याची गरज भासणार नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 856
थोरात कारखाना बाळासाहेब थोरात वार्षिक सभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.