Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पाणीटंचाई आणि चारा प्रश्नावर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर; पालक सचिवांचे महत्त्वाचे निर्देश

26/11/2026

वाळू वाहतुकीसाठी ४० हजारांचा हप्ता घेताना पोलिस हवालदार जाळ्यात; लाचलुचपत विभागाची कारवाई

26/11/2026

संगमनेर पालिकेचा ‘नाट्यमय’ कारभार! नाट्यगृहाच्या लोकार्पणानंतर सीओंची पलटी; लोकार्पण झालेच नाही तर मग सोहळ्यात मुख्याधिकारी ‘नटून थटून’ का मिरवत होते? संगमनेर नाट्यगृह वादावर जनतेचा संताप

26/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार सत्यजीत तांबे यांचे अहिल्यानगर, नाशिक, जळगांव, धुळे आणि नंदुरबारच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन; बदली प्रक्रिया पूर्ण झालेल्या शिक्षकांना…
शिक्षण

आमदार सत्यजीत तांबे यांचे अहिल्यानगर, नाशिक, जळगांव, धुळे आणि नंदुरबारच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन; बदली प्रक्रिया पूर्ण झालेल्या शिक्षकांना…

शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना कार्यमुक्त न करणे ही अन्यायकारक बाब आहे. तरी तातडीने सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करून त्यांची नवीन शाळांमध्ये पदस्थापना करावी, अशी ठाम मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.

सध्या अहिल्यानगर व धुळे जिल्हा परिषदेने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करून नवीन शाळांमध्ये रुजू होण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जळगाव जिल्हा परिषदेने देखील या संदर्भात कार्यवाही सुरू केली असून पुढील आठवड्यात सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातही लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

आमदार तांबे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बदली प्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षकांची नियुक्ती नवीन शाळांमध्ये निश्चित झाली असली तरी अद्याप त्यांना मूळ शाळेतून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम आणि असमाधान निर्माण झाले आहे. त्याचा थेट परिणाम शैक्षणिक कामकाजावर होत असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना कार्यमुक्त न करणे ही अन्यायकारक बाब आहे. तरी तातडीने सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करून त्यांची नवीन शाळांमध्ये पदस्थापना करावी, अशी ठाम मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.


जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाली असून शिक्षकांची नवीन शाळांमध्ये नियुक्ती निश्चित करण्यात आली आहे. तरी सुद्धा अनेक शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेतून अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांना तातडीने कार्यमुक्त करून नवीन शाळांमध्ये हजर होण्याची संधी द्यावी. जर शिक्षकांना वेळेत कार्यमुक्त केले गेले नाही तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. बदली आदेश मिळाल्यानंतरही शिक्षक जुन्या शाळेत राहतात त्यामुळे नवीन शाळेत शिक्षकांची कमतरता जाणवते. परिणामी विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ अध्यापन मिळत नाही आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे केवळ शिक्षकांचा संभ्रम वाढत नाही तर शैक्षणिक हितालाही बाधा येते. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून कार्यमुक्तीची प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी असे माझे ठाम मत आहे. – आमदार सत्यजीत तांबे

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 620
मागणी सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर पालिकेचा ‘नाट्यमय’ कारभार! नाट्यगृहाच्या लोकार्पणानंतर सीओंची पलटी; लोकार्पण झालेच नाही तर मग सोहळ्यात मुख्याधिकारी ‘नटून थटून’ का मिरवत होते? संगमनेर नाट्यगृह वादावर जनतेचा संताप

26/11/2026

नाट्यगृहावरून राजकीय नाट्य रंगले… विरोधकांनी मुख्याधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून प्रसिद्धीपत्रक काढले, कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे लोकार्पण दुष्काळामुळे साध्या पद्धतीने; ३.३३ लाखाची मदत दुष्काळ निधीसाठी: गटनेत्या दिपाली पंचारिया

26/11/2026

संगमनेरच्या नाट्यगृहाच्या उद्घाटनात विचित्र समीकरण; सूत्रसंचालनाच्या ‘अजब’ राजकीय गणितावर ठाकरे सेनेचे अमर कतारी यांचा थेट हल्लाबोल!

26/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

पाणीटंचाई आणि चारा प्रश्नावर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर; पालक सचिवांचे महत्त्वाचे निर्देश

By Annant Ppangarkar26/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज- अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी जलस्रोतांचे बळकटीकरण, प्रलंबित नळ योजनांची…

वाळू वाहतुकीसाठी ४० हजारांचा हप्ता घेताना पोलिस हवालदार जाळ्यात; लाचलुचपत विभागाची कारवाई

26/11/2026

संगमनेर पालिकेचा ‘नाट्यमय’ कारभार! नाट्यगृहाच्या लोकार्पणानंतर सीओंची पलटी; लोकार्पण झालेच नाही तर मग सोहळ्यात मुख्याधिकारी ‘नटून थटून’ का मिरवत होते? संगमनेर नाट्यगृह वादावर जनतेचा संताप

26/11/2026

ठाण्यात काँग्रेसची संविधान बचाव रॅली… संविधान रक्षणासाठी पुन्हा स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेतून लढा आवश्यक: बाळासाहेब थोरात

26/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.