Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बदलत्या राजकारणातही माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचे ‘यशोधन’ कार्यालय सर्वसामान्यांचे हक्काचे मदत केंद्र
सामाजिक

बदलत्या राजकारणातही माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचे ‘यशोधन’ कार्यालय सर्वसामान्यांचे हक्काचे मदत केंद्र

अधिक माहितीसाठी, यशोधन कार्यालयाशी 02425-227303, 04 किंवा 9689304304 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/09/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक बदल झाले असले तरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे संगमनेरमधील ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालय सामान्य नागरिकांसाठी एक विश्वासार्ह आणि हक्काचे मदत केंद्र म्हणून उभे आहे. हे कार्यालय, राजकीय स्थिती कशीही असो, जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी २४ तास कार्यरत असल्याचे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरचे राजकीय समीकरण बदलले असले तरी, बाळासाहेब थोरात यांचे हे जनसंपर्क कार्यालयाने आजही सामान्य नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणेच मदतीचे आणि विश्वासाचे केंद्र म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे. त्यांच्या प्रामाणिक कामामुळे आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेमुळे हे कार्यालय कायमच जनतेच्या हितासाठी कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला जातो.
स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जनसेवेचा वारसा पुढे नेत बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून संगमनेर तालुक्यात अथक काम केले आहे. याच कामामुळे संगमनेर तालुक्याने राज्य नव्हे तर देश पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. जयश्री थोरात यांच्या मते, थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाची कामे राबवली आहेत आणि जनतेचे मोठे प्रेम मिळवले आहे. यशोधन कार्यालय हे याच निष्ठेचे प्रतीक असून, ते नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. भविष्यातही हे कार्यालय याच तत्परतेने काम करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एक तालुका, एक परिवार: विकासाचे अनोखे मॉडेल – बाळासाहेब थोरात यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे आणि प्रामाणिक कार्यशैलीमुळे संगमनेर तालुक्यात ‘एक तालुका, एक परिवार’ ही संकल्पना रुजली आहे. १७१ गावे आणि २४८ वाड्या-वस्त्या असलेल्या या मोठ्या तालुक्यात थोरात यांनी सातत्याने विकास कामे केली आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे, निळवंडे धरण आणि कालव्याचे काम पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.
याचा फायदा तळेगाव गटातील अनेक शेतकऱ्यांना झाला असून, वितरिकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. याचबरोबर, संगमनेर शहरात थेट पाईपलाईन, हाय-टेक इमारती आणि आधुनिक सुविधा निर्माण करून शहराला नासिक-पुणे-छत्रपती संभाजीनगर या शहरांच्या त्रिकोणात मध्यवर्ती मोठे केंद्र बनवण्यात थोरात यांचे मोठे योगदान आहे.
२४ तास कार्यरत मदत केंद्र – यशोधन कार्यालय केवळ राजकीय कामांसाठी नाही, तर नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी २४ तास कार्यरत आहे. या कार्यालयात विविध विभागांद्वारे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. यामध्ये, १२,००० हून अधिक घरेलू आणि असंघटित कामगारांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला गेला आहे. वैद्यकीय मदतीसाठी सरकारी योजनांसह एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्या माध्यमातूनही लोकांना मदत केली जाते.
या कार्यालयाचे कार्य इतके प्रभावी आहे की, जिल्ह्याबाहेरील तसेच राज्यातील अनेक राजकीय नेते कार्यालयाला भेट देऊन त्यांच्या कार्यपद्धतीचे अनुकरण करत आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातही ‘यशोधन पॅटर्न’ राबवण्यात आला आहे.

लोकनेत्यांशी थेट संपर्क: कायम गजबजलेले कार्यालय- 
यशोधन कार्यालयाची सर्वात मोठी ओळख म्हणजे येथे सामान्य माणूसही थेट लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्याशी संपर्क साधू शकतो. कुणाचीही मध्यस्थी न घेता, साधा फोन करूनही सर्वसामान्य नागरिक आपल्या प्रश्नांची मांडणी करू शकतो आणि त्याचे निराकरण केले जाते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे कार्यालय याच लोकांसाठी गजबजलेले असते.
अधिक माहितीसाठी, यशोधन कार्यालयाशी 02425-227303, 04 किंवा 9689304304 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 737
जयश्री थोरात बाळासाहेब थोरात यशोधन सत्यजित तांबे सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.