Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रीलसाठीचा स्टंट भोवला, पोलिसांनी रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या युवकावर केला गुन्हा दाखल; बघा आपबीतीचा व्हिडिओ…
गुन्हेगारी

रीलसाठीचा स्टंट भोवला, पोलिसांनी रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या युवकावर केला गुन्हा दाखल; बघा आपबीतीचा व्हिडिओ…

संगमनेर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरात किंवा तालुक्यात कोणीही बेदरकारपणे वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 19, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

संगमनेर शहर पोलिसांनी बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शहरातील जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर कॉलेज आणि १३२ केव्ही सबस्टेशनजवळ घडला.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2025/09/VID-20250919-WA0028.mp4

हा अपघात एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर आला. व्हिडिओमध्ये, यश अनुप अरगडे (वय २०), रा. गुंजाळवाडी, संगमनेर, हा त्याच्या रॉयल एनफिल्ड जीटी ६५० (क्रमांक एमएच ०४ एलए २५३१) दुचाकीला मुख्य रस्त्याऐवजी भरधाव वेगात फूटपाथवरून चालवत होता. २६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२:३० च्या सुमारास घडलेल्या या अपघातात यश स्वतः आणि त्याचा मित्र प्रतीक सचिन गुंजाळ (वय १८) दोघेही गंभीर जखमी झाले.

हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला होता. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत, व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिली आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार कायदेशीर कारवाई केली. तपासात असे निष्पन्न झाले की, यशचा मित्र शिवम दिघे याने आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलिसांनी शिवमवरही यशला गुन्हा करण्यास चिथावणी दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), (ब), ४९ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १८९ नुसार गुन्हा क्रमांक ८४२/२०२५ दाखल करण्यात आला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, संगमनेर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरात किंवा तालुक्यात कोणीही बेदरकारपणे वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 3,676
गुन्हेगारी रिल्स स्टंट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.