संगमनेर – सीबीएसईच्या राष्ट्रीय एरोबिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने आपला डंका वाजवताना दहा पदकांसह चार चषके पटकावली. शिर्डीच्या द्रोणा अकादमीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत ध्रुव ग्लोबलच्या एरोबिक्सपटूंनी सर्व गटात उत्कृष्ट प्रदर्शन केले.
वैयक्तिक सादरीकरणाच्या अकरा, चौदा आणि सतरा वर्षांखालील वयोगटात इशान उगले, राजवीर आवारी आणि स्पर्श घुले यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक मिळवले. चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात अनिका चांडक, लब्धी कटारिया, ऋद्धी दरडा, त्रिशा गांधी, आराध्या जोशी, गुंजल करवा व यशश्री लाहोटी यांच्या संघाने फिटनेस एरोबिक्समध्ये रौप्य पदकासह विजेतेपदही मिळवले.
या स्पर्धेत ध्रुवच्या एरोबिक्सपटूंनी विविध गटांमध्ये एकूण 10 पदकांसह चार चषकं पटकावले. कुलदीप कागडे यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे व क्रीडा विभागप्रमुख गिरीश टोकसे यांनी अभिनंदन केले आहे.
राष्ट्रीय एरोबिक्स स्पर्धेत ध्रुवचा डंका
या स्पर्धेत ध्रुवच्या एरोबिक्सपटूंनी विविध गटांमध्ये एकूण 10 पदकांसह चार चषकं पटकावले.