Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हनुमान जयंती वादाचा परिणाम: चंद्रशेखर चौकातील नवरात्र उत्सवाला या कारणामुळे पोलिसांनी नाकारली परवानगी
महाराष्ट्र संवाद विशेष

हनुमान जयंती वादाचा परिणाम: चंद्रशेखर चौकातील नवरात्र उत्सवाला या कारणामुळे पोलिसांनी नाकारली परवानगी

पोलीस प्रशासनाने दोन्ही मंडळांना सामंजस्याने चर्चा करून नवरात्र उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस स्टेशनकडून संबंधितांना दिनांक १६/०९/२०२५ रोजी पत्रही पाठवण्यात आले होते. तरीही दोन्ही मंडळांनी कोणत्याही प्रकारची सामंजस्याची भूमिका न घेता आपापले कार्यक्रम एकाच ठिकाणी आयोजित करण्यावर ठाम असल्याचं दिसून येत असल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर –

संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी चंद्रशेखर हिंदू मंडळ आणि चंद्रशेखर चौक नवरात्र उत्सव समिती या दोन्ही मंडळांनी पोलिस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, परंतु शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मोठा निर्णय घेत ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यावेळी चंद्रशेखर चौकात उत्सव होणार की नाही हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

यावर्षी पोलीस प्रशासनाकडे चंद्रशेखर हिंदू मंडळ आणि चंद्रशेखर चौक नवरात्र उत्सव समिती या दोन्ही मंडळांनी दिनांक २२/०९/२०२५ ते ०२/१०/२०२५ या कालावधीत नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्याचे नियोजन केले होते. मात्र, याच चौकात काही दिवसांपूर्वी झालेल्या हनुमान जयंती रथोत्सव मिरवणुकीमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

हनुमान जयंती उत्सवावेळी घडलेल्या गुन्ह्याचा तसेच संगमनेर शहर व परिसरामध्ये घडलेल्या मागील काही घटना व सद्य परिस्थितीतील राजकीय जातीय व धार्मिक परिस्थितीचा विचार करता यंदा दोन्ही मंडळे एकाच ठिकाणी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करत असल्यामुळे पुन्हा वाद होण्याची आणि गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलीस प्रशासनाने दोन्ही मंडळांना सामंजस्याने चर्चा करून नवरात्र उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस स्टेशनकडून संबंधितांना दिनांक १६/०९/२०२५ रोजी पत्रही पाठवण्यात आले होते. तरीही दोन्ही मंडळांनी कोणत्याही प्रकारची सामंजस्याची भूमिका न घेता आपापले कार्यक्रम एकाच ठिकाणी आयोजित करण्यावर ठाम असल्याचं दिसून येत असल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.

त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, पोलिसांनी दोन्ही मंडळांना नवरात्र उत्सवासाठी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्यानंतरही जर मंडळांनी कार्यक्रम आयोजित केल्यास, त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल आणि ही नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला असून परवानगी नाकारत असल्याचे पत्र संबंधित मंडळाच्या प्रमुखांना दिले आहे.

कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे आता दोन्ही मंडळाकडून काय निर्णय घेतला जातो, या वादाला राजकीय वळण मिळते की पोलीस प्रशासनाच्या निर्णयाचे दोन्ही मंडळाकडून पालन केले जाते याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,764
चंद्रशेखर चौक नवरात्र उत्सव नोटीस संगमनेर शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील बहुचर्चित खून प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश जाधव…

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.