Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दरोड्याचा कट उधळला, कुख्यात गौरव घायाळ टोळी जेरबंद
गुन्हेगारी

दरोड्याचा कट उधळला, कुख्यात गौरव घायाळ टोळी जेरबंद

पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्यासह पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, हृदय घोडके, दीपक घाटकर, राहुल द्वारके, सुरेश माळी, अतुल लोटके, भीमराज खर्से, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, राहुल डोखे, सोमनाथ झांबरे, भगवान थोरात, विशाल तनपुरे, योगेश कर्डिले, भगवान धुळे, आणि महादेव भांड यांचा समावेश होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/09/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी – नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या दरोड्याचा कट उधळून लावला असून, कुख्यात गुंड गौरव घायाळ आणि त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, तलवार, आणि इतर साहित्य असा एकूण ७.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धडाकेबाज कारवाई नगर-पुणे महामार्गावरील चास घाटाजवळ रात्रीच्या वेळी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्यासह पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, हृदय घोडके, दीपक घाटकर, राहुल द्वारके, सुरेश माळी, अतुल लोटके, भीमराज खर्से, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, राहुल डोखे, सोमनाथ झांबरे, भगवान थोरात, विशाल तनपुरे, योगेश कर्डिले, भगवान धुळे, आणि महादेव भांड यांचा समावेश होता.
२० सप्टेंबरच्या रात्री हे पथक नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांना गुप्त माहिती मिळाली की, चास घाटाजवळ एक काळ्या रंगाची इनोव्हा (क्रमांक MH 01 VA 7422) थांबलेली आहे. या गाडीत कुख्यात गुंड गौरव घायाळ आणि त्याचे ३ ते ४ साथीदार दरोड्याच्या तयारीत आहेत.
मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी पथकाने रात्री ३:५० वाजता घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना सांगितल्याप्रमाणे एक इनोव्हा गाडी अंधारात उभी दिसली. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्या गाडीतील संशयितांना ताब्यात घेतले. गौरव हरीभाऊ घायाळ (वय २४, रा. सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), सतिष बाळासाहेब पावडे (वय ३५, मूळ रा. दरोडी, ता. पारनेर, हल्ली रा. सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), अनिकेत रमेश साळवे (वय २९, रा. ओम एंटरप्रायझेसच्या पाठीमागे, सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), विशाल सुरेश जाधव (वय २३, रा. अपधूप रोड, सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) व गोविंद बबनराव गाडे (वय ३६, रा. ग्रामपंचायत मागे, सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) अशी असल्याचे तपासात समोर आले.
पोलीस पथकाने संशयितांना अंधारात थांबण्याचे कारण विचारले असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता तपासणीदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून मोठा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ३०,००० रुपये किमतीचे १ पिस्तूल, १ जिवंत काडतूस, ५०० रुपये किमतीची १ तलवार, १०० रुपये किमतीचा १ गिलव्हर, १ बेसबॉलचा दांडका, ६०,००० रुपये किमतीचे ६ मोबाईल फोन आणि ७ लाख रुपये किमतीची इनोव्हा गाडी, असा एकूण ७ लाख ९० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल आहे.
मुख्य आरोपी गौरव घायाळ याच्याविरुद्ध सुपा, पारनेर, नगर आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या सर्व आरोपींविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१० (४), ३१० (५), ३१० (६) आणि आर्म्स ॲक्ट ३/२५, ४/२५ नुसार दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपींना पुढील तपासासाठी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील संभाव्य मोठा गुन्हा टळला आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,107
गुन्हेगारी टोळी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.