Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिबट्याच्या हल्ल्यात 22 वर्षीय आदिवासी शेतमजूर ठार; परिसरात भीतीचे वातावरण
महाराष्ट्र संवाद विशेष

बिबट्याच्या हल्ल्यात 22 वर्षीय आदिवासी शेतमजूर ठार; परिसरात भीतीचे वातावरण

वन विभागाने नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात विविध ठिकाणी पिंजरे लावले आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
बेलापूर (अकोले): बिबट्याच्या हल्ल्यात बावीस वर्षीय आदिवासी शेतमजुराचा मृत्यू झाल्याची अकोले तालुक्याला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या हल्ल्याचा प्रकार रविवारी सकाळी समोर आला.
पप्पू बाळू दुधवडे (रा. ब्राह्मणदरा, म्हसवंडी, अकोले) असे ठार झालेल्या दुर्दैवी शेतमजुराचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना 21 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मल्हारवाडी येथील भिसे वस्तीजवळ समोर आली. या घटनेमुळे दुधवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बेलापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पप्पू दुधवडे हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घटनेच्या दिवशी शनिवारी ते कामावरून घरी परतत असताना, रात्री त्यांच्या गाडीचे पेट्रोल संपले. त्यामुळे त्यांनी रस्त्यातील एका ओळखीच्या घराजवळ गाडी लावून पायी घराकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहाटेच्या सुमारास एका तरुणाला रस्त्याच्या कडेला बिबट्याने हल्ला केलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती तात्काळ गावचे पोलीस पाटील केशव त्रिभुवन आणि भगवानदादा काळे यांनी अकोले पोलीस स्टेशन व वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि अकोले पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोतुळ येथील कुटीर रुग्णालयात पाठवला.
वन विभागाने नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात विविध ठिकाणी पिंजरे लावले आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, वन विभागाने या नरभक्षक बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,055
बिबट्या हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.